आमीरचा आश्‍चर्यकारक लूक 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

आमीर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतो हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. तो त्याच्या अपार मेहनतीने चित्रपट हिट करतोच करतो.

प्रत्येक चित्रपटासाठी त्याच्या लुक्‍सची चर्चाही रंगात असतेच. तो सध्या त्याच्या आगामी "ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटासाठीही खूप मेहनत घेतो आहे. नुकताच सुशांत सिंग राजपूतने आमीरबरोबर त्याचा फोटो इन्साग्रामवर शेअर केला. त्यामध्ये सुशांतबरोबर असलेल्या आमीरला पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल.

या फोटोमध्ये आमीरने नोज रिंग घातलेली दिसतेय. नक्की भानगड काय आहे, असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याच्या चित्रपटासाठीच त्याने हे सगळं केलं आहे. नोज रिंग आणि मोठ्या मिशा, कानात बाली असा त्याचा अवतार आहे. हा त्याचा धमाकेदार लूक "ठग्ज'मध्ये काय जादू करतो हे बघणे प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक असणार आहे. 

Web Title: Aamir Khan gets his nose pierced: Is it for Thugs of Hindostan?