परफेक्शनिस्ट आमिर खानने आजपर्यंत एव्हरग्रीन रेखासोबत का नाही केलं एकाही सिनेमात काम?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

अभिनेता आमिर खानने अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. त्याने त्याच्या सिनेमांमध्ये नवीन चेह-यांना देखील संधी दिली आहे. मात्र एव्हरग्रीन अभिनेत्री रेखासोबत आमीरने एकाही सिनेमात काम न करण्यामागे काय आहे कारण?

मुंबई- बॉलीवूडमध्ये बडे स्टार एकमेकांसोबत काम करताना अनेकदा अडचणी येतात. काही सेलिब्रिटींमध्ये तगडी स्पर्धा असल्याने एकाच सिनेमात त्यांना मिळणारी भूमिका किती महत्वाची आहे यावर अनेकदा प्रश्न निर्माण होतात तर काही सेलिब्रिटींमध्ये एकमेकांसोबत सुसंवादाचा अभाव असल्याने, त्यांचे टँट्रम्स अशा काही गोष्टींमुळे एकमेकांसोबत काम करण्याचं टाळतात. असंच काहीसं आहे ते बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या बाबतीत.  या दोघांनीही त्यांच्या आत्तापर्यंतच्या सिनेकारकिर्दीमध्ये एकमेकांसोबत काम केलेलं नाही. यामागचं कारण ऐकलंत तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

हे ही वाचा: अमृता सिंहने गायलेलं हे गाणं ऐकल्यावर सैफ झाला होता तिच्यावर फिदा, व्हिडिओच्या शेवटी पाहा काय केलं.. 

अभिनेता आमिर खानने अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. त्याने त्याच्या सिनेमांमध्ये नवीन चेह-यांना देखील संधी दिली आहे. मात्र एव्हरग्रीन अभिनेत्री रेखासोबत आमीरने एकाही सिनेमात काम न करण्यामागे काय आहे कारण? खरंतर यामागे खुप जुनी घटना आहे. ही घटना आमीरच्या वडिल्यांच्या सेटवर घडली होती. असं म्हटलं जातं की परफेक्शनिस्ट आमिर खानला रेखाची कामाप्रती असलेली वागणूक खटकत होती. आमीर खान सेटवरील तिची वागणूक पाहून नाराज होता. याच कारणामुळे आमीरने आधीपासूनंच रेखासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. सिनेमांच्या सेटवरचं रेखांचं वागणं याला कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. 

रेखा ८० आणि ९० च्या दशकातील मोठी स्टार होती. त्यावेळी अनेक निर्माते रेखाचे चाहते होते. त्यातंच प्रेक्षकही रेखाच्या प्रेमात होते. रेखाने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सिनेइंडस्ट्रीत तिचं नाव कमावलं मात्र असं असतानाही आमीरने तिच्यासोबत कधीच पडद्यावर एकत्र काम करणं पसंत केलं नाही. रे

खा आमिरचे वडिल ताहिर हुसैन यांच्यासोबत लॉकेट सिनेमासाठी काम करत होती. त्यावेळी आमीरने रेखाचा स्वभाव आणि सेटवर तिची असणारी वर्तणुक याचं बारकाईने निरीक्षण केलं. सेटवर आमिरला तिची काम करण्याची वेगळी स्टाईल आणि तिचं सतत उशीरा येणं या गोष्टींचा सामना करावा लागला होता. परिणामी सिनेमाचे सीन पुन्हा शूट करावे लागत असल्याचं म्हटलं जातं. हेच कारण होतं जे आमीरला कधीच पटलं नाही. या गोष्टीमुळे आमिरने रेखासोबत पडद्यावर काम न करण्याचा निर्णय घेतला.

Rekha's letter to Aamir Khan bring tears to his eyes | Filmymantra

लॉकेट हा सिनेमा ताहीर हुसैन यांची निर्मिती होती. रेखा तिच्या कामाप्रती मेहनती नव्हती. याऊलट आमीर त्याची प्रत्येक भूमिका चोख आणि अभ्यासपूर्ण पार पाडायचा. मात्र जेव्हा केव्हा हे दोघंही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर आले तेव्हा आमीर तिच्यासोबत प्रेमळपणे वागतानाच दिसून आला.   

aamir khan has never shared silver screen with rekha due to this reason  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aamir khan has never shared silver screen with rekha due to this reason