Aamir Khan : सगळं सोडून आमिर नेपाळला का गेलाय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan In Nepal Meditation center Bollywood industry break

Aamir Khan : सगळं सोडून आमिर नेपाळला का गेलाय?

Aamir Khan In Nepal Meditation center Bollywood industry break : आमिर खानच्या बाबत काहीही असले तरी त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची चर्चा सुरु होते. खरंतर आमिरला त्याच्याच वक्तव्यांनी अडचणीत आल्याचे दिसून आले आहे. त्याच्या लाल सिंग चढ्ढामुळे आमिरवर वेगळा शिक्का बसला आणि त्यामुळे त्याचा त्याला फटकाही बसला. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर सध्या नेपाळला जाऊन पोहचला आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

आमिर हा सध्या नेपाळमधील बुधनिलकंथाच्या विपश्यना सेंटरमध्ये असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर आमिर खान नेपाळला गेल्याचे कळताच वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र अजुनपर्यत एक गोष्ट कन्फर्म झालेली नाही. ती म्हणजे आमिर तिथे कुटूंबासमवेत गेला आहे की एकटा, आमिर पुढील दहा दिवस नेपाळमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशातच आमिर बॉलीवूडमधील मोहमाया पासून लांब गेल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गेल्या वर्षांपासून आमिर खान वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल होतो आहे. यापूर्वी त्याच्या चित्रपटांना चाहत्यांचा मिळणारा तुफान प्रतिसाद लाल सिंग चढ्ढाच्यावेळी पूर्ण नकारात्मक होता. असे दिसून आले. वास्तविक आमिर खाननं आपल्या वक्तव्यावरुन चाहत्यांची माफी मागितली होती. मात्र तरीही सोशल मीडियावर आमिरचा जो ट्रेंड सुरु झाला त्याचा परिणाम लाल सिंग चढ्ढावर झाला होता. आमिरनं आपल्याला या गोष्टीचे खूप वाईट वाटल्याचे सांगितले होते.

आमिर खान हा बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आहे. तो त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांचा विषय, त्याची मांडणी ही नेहमीच चर्चेचा विषय असते. आजवर आमिरनं जे चित्रपट केले आहे त्यातून ते वेगळेपण अधोरेखित होते. मात्र त्यानं हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप चित्रपटाचा हिंदीत केलेला रिमेक हा अनेकांना खटकला होता. मुळातच आमिरला हा चित्रपट का करावासा वाटला असे प्रश्न त्याला नेटकऱ्यांनी विचारले होते.

२०१८ मध्ये आमिरच्या ठग्स ऑफ हिंदूस्थानला देखील प्रेक्षकांनी नाकारले होते. तेव्हापासून तो चांगल्या चित्रपटाच्या शोधात आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टसविषयी सांगायचे झाल्यास, आर एस प्रसन्ना चॅम्पियनची निर्मितीच्या प्रक्रियेत व्यस्त आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळला जाण्यापूर्वी गझनीच्या निर्मात्यांना भेटला होता.