#MeToo : दिग्दर्शकावरील लैंगिक छळाच्या आरोपामुळे आमिर खानची सिनेमातून एक्झिट

Aamir Khan left mugul movie because allegation of sexual harassment on the director
Aamir Khan left mugul movie because allegation of sexual harassment on the director

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर देशभरात 'मी टू' (#MeToo) या मोहिमेने जोर धरला आहे. अनेक सेलेब्रिटींनी सिनेसृष्टीत होणारा लैंगिक छळ आणि गैरवर्तनासंबंधी सत्य समोर आणले आहे. परफेक्शनीस्ट आमिर खान याने देखील या विषयावर एक महत्तवपूर्ण भूमिका घेतली आहे.  

लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या एका दिग्दर्शकाच्या सिनेमातून आमिरने काढता पाय घेतला आहे. सोशल मिडीयाद्वारे आमिर खान आणि पत्नी किरण रावने ही माहिती दिली. 'आम्ही ज्या व्यक्तीबरोबर काम करणार होतो त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत, असं आम्हाला समजलं. याबाबत आम्ही चौकशी केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळाली. पण अद्याप या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. म्हणून सिनेमातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारास आम्ही नेहमीच विरोध केला आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकरणांमध्ये खोटे आरोप करणाऱ्यांचीही निंदा करतो,' असं आमिर आणि किरण यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलं आहे. 

2004 मध्ये एका दिग्दर्शकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक मॉडेल त्या दिग्दर्शकाच्या थोबाडीत मारताना दिसत आहे. लैंगिक छळाचा आरोप मॉडेलने त्या दिग्दर्शकावर केला होता. कदाचित याच प्रकरणावरुन आमिरने हे पत्रक काढले असावे अशी चर्चा आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com