'मी तुझं काय बिघडवलयं..', आमिर खाननं तक्रार करताच कपिलनं धरले त्याचे पाय...Aamir Khan Fan On Kapil Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan Fan On Kapil Sharma

Aamir Khan Fan On Kapil Sharma: 'मी तुझं काय बिघडवलयं..', आमिर खाननं तक्रार करताच कपिलनं धरले त्याचे पाय...

Aamir Khan Fan On Kapil Sharma:बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सध्या चित्रपटांमधून ब्रेक घेऊन वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. दोन मोठ्या बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटानंतर सुपरस्टार काही दिवसांसाठी ब्रेकवर आहे.

आमिर खान नुकताच पंजाबला गेला होता. येथे अभिनेता टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकच्या पंजाबी चित्रपट 'कॅरी ऑन जट्टा 3' च्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. जिथे आमिरसह संपूर्ण टीमने खूप धमाल केली. याच कार्यक्रमाला कॉमेडी किंग कपिल शर्माही या कार्यक्रमाला उपस्थित होता.

कार्यक्रमादरम्यान कपिल शर्मा आणि अमिल खान स्टेजवर एकत्र उपस्थित होते तेव्हा दोघांनीही खूप धमाल झाली. कपिलला पाहताच आमिर खानने त्याचं तोंड भरुन कौतुक केलं.

या कार्यक्रमादरम्यान आमिर खान त्याच्या सोनी टीव्हीच्या कॉमेडी कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो'बद्दल देखील बोलला. या शोमध्ये बॉलिवूडपासून ते क्रीडा जगतातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. मात्र आमिर खान अजूनही या शोपासून दूर आहे.

यावेळी आमिर म्हणतो की, मी स्वतः कपिल शर्माचा खूप मोठा चाहता आहे. त्याने माझ्या अनेक संध्याकाळ रंगीत केल्या आहेत. त्याचा कार्यक्रम पाहून मला खूप हसू येत. तो खूप मनोरंजन करतो. म्हणून दोन-तीन आठवड्यांपूर्वी मी त्याला फोन केला आणि धन्यवाद म्हटलं.

तुझे खूप खूप आभार की तू लोकांचं इतकं मनोरंजन करतो, लोकांचे मनोरंजन करणं हे खुप मोठ काम आहे. तुला इथे पाहून मला खूप आनंद झाला.

मी कपिल तुझा मोठा चाहता आहे आणि तू मला शोमध्ये कधीही बोलवलं नाहीस, ही खुप चुकीचा गोष्ट आहे.'

आमिर खानचे बोलणे ऐकून तेथे उपस्थित सर्व लोक हसू लागले. यानंतर कपिल शर्मा आधी आमिर खानला मिठी मारली.

त्यानंतर कपिल म्हणतो की, ज्या दिवशी आमिर शो मध्ये येईल तो त्याच्यासाठी खुप भाग्याचा दिवस राहिल. नक्की शोमध्ये या.

यावर आमिर म्हणाला की तो 100% येईन, पण त्याला त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नव्हे तर त्याला मनोरंजनासाठी बोलावले तर तो येईल.