Aamir Khan: 'माझ्या जवळच्या लोकांमुळे...', आमिर खानने इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचे सांगितले कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan

Aamir Khan: 'माझ्या जवळच्या लोकांमुळे...', आमिर खानने इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचे सांगितले कारण

अभिनेता आमिर खान सध्या ब्रेकवर आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटानंतर त्याने ब्रेकची घोषणा केली होती. यामुळे त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. आमिर खानने चित्रपटसृष्टीतून का ब्रेक घेतला, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती.

'लाल सिंह चड्ढा'च्या माध्यमातून आमिर तब्बल चार वर्षांनी पडद्यावर दाखल झाला होता. या चित्रपटानंतर त्याने पुन्हा ब्रेक घेतला. पण का? याचे उत्तर नुकतेच आमिर खानने दिले आहे.

आमिर खान ब्रेकवर आहे, परंतु तो अनेकदा कार्यक्रमांमध्ये दिसतो. नुकताच तो एका बुक लाँच कार्यक्रमात दिसला. यादरम्यान अभिनेत्याला त्याच्या ब्रेकबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना आमिर खान म्हणाला, 'माझ्या जवळचे लोक माझी चेष्टा करतात. ते नेहमी म्हणतात की तू नेहमी ब्रेकवर होतास. तू कुठे चित्रपट करतोस, आणि आता ब्रेक घेत आहे.

तो पुढे म्हणाला, 'जेव्हा मी एक अभिनेता म्हणून चित्रपट करतो तेव्हा मी त्यात इतका हरवून जातो की मला आयुष्यात दुसरे काही दिसत नाही. याच कारणामुळे मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

आमिर खान म्हणाला, 'मी 'लाल सिंह चड्ढा' नंतर 'चॅम्पियन्स'साठी शूटिंग करणार होतो. एक अप्रतिम आणि हृदयस्पर्शी चित्रपट पण मला ब्रेक घ्यायचा होता. मला माझे कुटुंब, मुले आणि आई यांच्यासोबत राहायचे आहे. मी गेली 35 वर्षे काम करत आहे, पण मला असे वाटते की माझ्या जवळच्या लोकांसोबत वाईट होत आहे. मला जाणवलं की आयुष्य वेगळं अनुभवण्याची हीच वेळ आहे.

बॉलिवूडचे मि. परफेक्शनिस्ट आता ब्रेकवर आहे, पण त्याला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, KGF डायरेक्टर प्रशांत नीलने त्याच्या आगामी चित्रपटासाठी आमिर खानशी संपर्क साधला आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय आमिर खान लवकरच YRF च्या Spy Universe मध्ये सामील होऊ शकतो. शाहरुख खाननंतर आमिर खानही स्पाय थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे.