#HappyBirthdayAamirKhan : सामाजिकता जपणारा, तरीही 200 कोटी कमावणारा आमीर खान!

गुरुवार, 14 मार्च 2019

आमीर खान अशा वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये कायमच व्यस्त असतो. त्याच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमीर...

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आज 54 वा वाढदिवस... 'पापा कहते है बडा नाम करेगा' इथून सुरू झालेला आमीरचा प्रवास यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 'यादों की बारात' या चित्रपटात आमीरने बालकलाकार म्हणून काम केले होते. आमीरने नेहमीच वेगवेगळे विषय आपल्या चित्रपटातून हाताळले आहेत. त्याने केलेल्या अनेक चित्रपटातून त्यांने काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आमीरच्या परफेक्ट अभिनयामुळे 'कयामत से कमायत तक', '3 इडियट्स', 'लगान', 'रंग दे बसंती' 'दिल चाहता है', 'पीके', 'तारे जमींन पर', 'दंगल' हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. अभिनयासोबतच आमीर सहदिग्दर्शक, दिग्दर्शक, पटकथालेखक, निर्माता याही क्षेत्रात झळकला. 'लगान' पासून आमीरने निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले. तर 'तारे जमींन पर' या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले होते. नुकताच 'आमीर खान प्रॉडक्शन्स'ची निर्मिती असलेला 'रूबरू रोशनी' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटातील 'लूक'मुळे आणि प्रमोशनच्या पद्धतीमुळे आमीर एक वेगळा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

 

2012 मध्ये सुरू झालेल्या 'सत्यमेव जयते' या रिअॅलिटी शोद्वारे त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले. समाजातील अनेक अडचणी हाताळून त्यावर अभ्यास व संशोधन करून त्याने 'सत्यमेव जयते' कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. आमीरने 'पानी फाऊंडेन'ची स्थापना करून महाराष्ट्रातील तळागाळात जाऊन दुष्काळ निवारण करण्यासाठी गावकऱ्यांना मदत केली. याचा निकालही चांगला मिळाला असे गावकऱ्यांचे मत आहे. 

Amir khan

आमीर खान अशा वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये कायमच व्यस्त असतो. त्याच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमीर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aamir Khan s 54 th Birthday