आमिर खान त्याच्या हिरोईन्सच्या हातावर थुंकायचा.. आमिर असं का करायचा हे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

अनेक सिनेमांमध्ये कॉमेडी भूमिका साकारणारा आमिर ख-या आयुष्यातही खोडकर आहे..करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात आमिरच्या को-स्टार अभिनेत्री त्याच्या या हरकतींमुळे हैराण असायच्या..

मुंबई- बॉलीवूड अभिनेता आमिर खान जो कोणता सिनेमा करतो तो मन लावून करतो..त्याच्या सगळ्या सिनेमांमध्ये तो जीव ओतून काम करण्यासाठी तो ओळखला जातो.. अनेक सिनेमांमध्ये कॉमेडी भूमिका साकारणारा आमिर ख-या आयुष्यातही खोडकर आहे..करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात आमिरच्या को-स्टार अभिनेत्री त्याच्या या हरकतींमुळे हैराण असायच्या..

हे ही वाचा: 'पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ' म्हणत १५ मराठी कलाकारांचा गाण्यातून नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न..

आमिर खानची ही खोडकर सवय ऐकून तुम्हीही हैराण व्हाल..आमिर खान त्याच्या कित्येक हिरोईनच्या हातावर थुकायचा..या खोडकरपणामुळे आमिर खान आणि जुही चावला एकमेकांशी बोलायचे बंद झाले होते..तर अभिनेत्री माधुरी दिक्षित त्याच्यामागे हॉकी स्टीक घेऊन धावायची..

Madhuri Dixit wishes Aamir Khan happy birthday: Still remember you ...

करिअरच्या सुरुवातीला आमिर खान आणि माधुरी दिक्षितने 'दिल' या सिनेमात एकत्र काम केलं होतं..या सिनेमातील 'खंबे जैसी खडी है' या प्रसिद्ध गाण्याच्या शूटींग दरम्यान आमीर खान माधुरीला म्हणाला होता की मी हातावरच्या रेषा वाचु शकतो..हे ऐकल्यावर माधुरीने तिचा हात त्याच्या बघायला सांगितला.. आमिर तिचा हात बघत होता आणि बघता बघता त्यावर थुंकून तो पळून गेला..आमिरच्या या हरकतीनंतर माधुरी त्याच्यामागे हॉकी स्टीक घेऊन धावली होती..

'इश्क' या सिनेमाच्या शूटींग दरम्यान आमिर खानने जुहीला सांगितलं होतं की तो हातावरच्या रेषा वाचू शकतो..मग काय जुहीने लगेचच हात पुढे केला..आणि मग पुन्हा आमिरने तोच खोडकरपणा करत जुहीच्या हातावर थुंकून पळून गेला..यानंतर जुहीला खूप राग आला आणि ती दुस-या दिवशी शूटींगला आलीच नाही..यामुळे आमिर देखील तिच्यावर चिडला.. आणि मग पुढे अनेक वर्ष हे दोघं एकमेकांशी बोलले नाहीत..मात्र त्यानंतर त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली..

RohitVerma on Twitter: "Aamir Khan and Juhi Chawla rare pic.… "

१८ व्या 'मुंबई फिल्म फेस्टीवल' दरम्यान फराह खानने आमिरच्या या खोडकरपणाविषयी चर्चा केली.. त्यावेळी 'जो जिता वही सिकंदर'चं रि-युनियन होतं.. सगळे कलाकार तिथे हजर होते..त्याचवेळी फराहने सांगितलं की आमिर त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या हिरोईन्सच्या हातावर थुकायचा... फराहच्या या गोष्टीवर आमिर मजेशीर उत्तर देत म्हणाला होता, 'मी ज्या ज्या अभिनेत्रीच्या हातावर थुकलो ती नंबर वन बनली..'

आमिरच्या आगामी सिनेमांविषयी सांगायचं झालं तर आमिर लॉकडाऊनच्या आधी त्याच्या 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमाचं शूट करत होता..मात्र कोरोनाच्या कारणामुळे सध्या संपूर्ण इंडस्ट्री ठप्प आहे..अशात आमिर सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे..  

aamir khan spits on the hands of heroines like madhuri dixit juhi chawla know why  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aamir khan spits on the hands of heroines like madhuri dixit juhi chawla know why