लंडनच्या रस्त्यावर लोक भावूक होऊन रडतानाचा व्हिडीओ व्हायरल.. आमिर खान ठरतोय कारण.. Aamir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan

Viral Video: लंडनच्या रस्त्यावर लोक भावूक होऊन रडतानाचा व्हिडीओ व्हायरल.. आमिर खान ठरतोय कारण..

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. आणि लाखो लोकांना भावूक करणारा हा व्हिडीओ 'मदर्स डे' च्या निमित्तानं शूट केलेला आहे. यामध्ये एक माणूस लंडनच्या रस्त्यावर आमिर खानचा सिनेमा 'तारे जमीन पर' मधील 'मेरी मा' हे गाणं गाताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून लोक खूप भावूक होताना दिसत आहेत. तर मदर्स डे च्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी हे गाणं ऐकलं..हा व्हिडीओ पाहिला त्यांना आपले अश्रू आवरणं अनावर झालेलं दिसून आलं.

आपलं घर,कुटुंब..आपल्या देशापासून लांब राहणाऱ्या प्रत्येकाला आईच्या आठवणीनं भरून आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.आता गाणं आमिर खानच्या गाजलेल्या सिनेमातलं असल्यानं नकळत आमिरचं नावही या व्हिडीओशी जोडलं जातंय. (Aamir Khan taare zameen par meri maa song viral video london street)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ १९ मार्च २०२३ चा आहे जेव्हा लंडनमध्ये मदर्स डे साजरा केला गेलेला. विश नावाचा एक स्ट्रीट सिंगर लंडनच्या रस्त्यांवर नेहमीच गाणं गातो. मदर्स डे च्या निमित्तानं त्यानं 'मेरी मा' हे गाणं गाऊन मातृत्वाला आदरांजली वाहिली.

विश गात असताना त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या प्रत्येकानं तिथं थांबून त्याच्या सुरात सूर मिसळवले. आणि आपापल्या आईचं स्मरण केलं. हे गाणं ऐकून लंडनमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला दूर देशात राहणारी आपली आई आठवून डोळे भरून आले.

विशनं आपल्या सुरेल आवाजात गाऊन साऱ्यांना थक्कं करून सोडलं. प्रत्येकाच्या अंगावर आईच्या आठवणीत शहारा दाटून आला. विशने गायलेलं हे गाणं अनेकांच्या मनाला स्पर्शून गेलं. याच व्हिडीओत विशनं लोकांना अपील केलं की प्रत्येकानं आपल्या आईला दिवसातून एकदातरी फोन करायला हवा. ती कशी आहे हे विचारायला हवं.

या व्हिडीओला अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पाहता पहता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 37K हून अधिक लाइक्स मिळाले आहेत तर 378K हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहते विशच्या सुरेल आवाजाची आणि गाण्याची जोरदार प्रशंसा करत आहेत.

हे काही पहिल्यांदाच घडत नाहीय जिथे विशच्या गाण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी देखील विशच्या गाण्याला जोरदार प्रशंसा मिळाली होती,ज्यात २००३ साली त्यानं सलमान खानच्या 'तेरे नाम' सिनेमातील गाणं गायलं होतं. तसंच,टी.व्ही अॅंकर मनीष पॉलनं देखील त्याच्यासोबत लंडनच्या रस्त्यावर ताल धरला आहे.