ख्रिसमस स्पेशल: कित्येक वर्ष बॉक्स ऑफिसचा सांता राहिलेल्या आमिर खानची यावेळी मात्र पोटली रिकामी

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 25 December 2020

दरवर्षी नाताळच्या दिवशी आमिर त्याचा सिनेमा रिलीज करतो. मात्र यावर्षी त्याचा कोणताच सिनेमा रिलीज झाला नाही.

मुंबई- बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणा-या आमिर खानच्या सिनेमांची चाहते दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. एका सिनेमाला जास्तीत जास्त वेळ देऊन त्यावर लागेल तेवढा वेळ काम करुन सिनेमे करण्यासाठी आमिर ओळखला जातो. आमिर त्याच्या सिनेमांमधून अनेकदा प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करतो. दरवर्षी नाताळच्या दिवशी आमिर त्याचा सिनेमा रिलीज करतो. मात्र यावर्षी त्याचा कोणताच सिनेमा रिलीज झाला नाही. नाताळच्या या खास दिवशी जाणून घेऊया आमिरच्या ख्रिसमट हिट्सविषयी..

हे ही वाचा: अभिनेता जॉन अब्राहम वाराणसीमध्ये शूटींग दरम्यान जखमी

तारे जमीन पर- आमिरचा हा सिनेमा २१ डिसेंबर २००७ ला रिलीज झाला होता. या सिनेमात दर्शिल सफारी या बालकलाकाराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ईशान नंदकिशोर अवस्थी नावाच्या या मुलाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. या कथेने सगळ्यांना भावूक केलं होतं. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

Taare Zameen Par

गजनी- आमिर खानने त्याच्या 'गजनी' सिनेमातून पुन्हा एकदा ख्रिसमस धमाका करण्यास सुरुवात केली होती. हा सिनेमा २५ डिसेंबर २००८ ला रिलीज झाला होता. या सिनेमामुळे बॉलीवूडमध्ये १०० कोटी क्लबची सुरुवात झाली. आमिर खान आणि असीन यांची केमिस्ट्री सोबतंच सिनेमाची कहाणी आणि आमिरच्या अप्रतिम लूकसोबत त्याचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. 

आमिर खान

धूम ३- 'धूम' फ्रँचायजीचा तिसरा सिनेमाची आमिरमुळे खूप चर्चा झाली होती. 'धूम ३' हा सिनेमा २० डिसेंबर २०१३ ला रिलीज झाला होता. या सिनेमाने केवळ देशभरातंच नाही तर विदेशात देखील कमाई केली होती. 

आमिर खान

हे ही वाचा: अभिनेते रजनीकांत हैद्राबादमधील हॉस्पिटलमध्ये दाखल ​

३ इडियट्स- आमिर खानच्या सिनेमांची कथा आणि त्याची निवड हाच त्याचा खरा युएसपी असतो. कॉमेडी, ड्रामा आणि इमोशन्सनी भरपूर असा आमिरचा सिनेमा असतो. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे 'थ्री इडियट्स.' या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटीपेक्षा जास्त कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 

3 Idiots | Max

पीके- अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत आणि आमिर खान स्टारर या सिनेमाला देखील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. २०१४ मध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज झालेल्या पीकेने बॉक्स ऑफीसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. प्रेक्षकांना आमिरचा एलियन अवतार आवडला होता. 

PK (film) - Wikipedia

दंगल- २०१६ मधील सगळ्यात बड्या सिनेमांपैकी एक असलेल्या 'दंगल' सिनेमात फोगट सिस्टर्स गीती आणि बबीता यांच्यातील रेसलिंग चॅम्पियनची कथा दाखवली होती. या सिनेमातील आमिर खानचं 'फॅट टू फिट' हे ट्रान्सफॉर्मेशेन सगळ्यात जास्त चर्चेत होतं. बॉक्स ऑफीसवर हा सिनेमा जबरदस्त हिट झाला होता. 

Aamir Khan Speaks For Zaira Wasim, Urges People to 'Leave Her Alone'

लाल सिंह चढ्ढा- करिना कपूरसोबत आमिर पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने काम करत आहे. हा सिनेमा यावर्षी २०२०च्या ख्रिसमसला रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य होऊ शकलं नाही आता हा सिनेमा २०२१च्या ख्रिसमसला रिलीज होणार असल्याचं कळतंय.     

Laal Singh Chadha takes a toll on Aamir Khan's health

aamir khans bollywood movies that released on christmas dangal pk and more and their box office  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aamir khans bollywood movies that released on christmas dangal pk and more and their box office