esakal | 'मला नजरकैदेत ठेवल्याची घटना विसरू शकत नाही'; आमिरच्या भावाने सांगितला अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

'मला नजरकैदेत ठेवल्याची घटना विसरू शकत नाही'; आमिरच्या भावाने सांगितला अनुभव

'मला नजरकैदेत ठेवल्याची घटना विसरू शकत नाही'; आमिरच्या भावाने सांगितला अनुभव

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आमिर खानचा Aamir Khans brother भाऊ फैजल खान Faissal Khan त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. त्या घटनेबाबत मी कुटुंबीयांना माफ केलं, मात्र ती घटना मी कधीच विसरू शकत नाही, असं फैजलने सांगितलं. फैजल नैराश्यात असून त्याला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया असल्याचं म्हणत त्याच्या कुटुंबीयांनी जवळपास एक वर्ष त्याला नजरकैदेत ठेवलं होतं. आता फैजल 'फॅक्टरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटामुळे फैजल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत फैजल म्हणाला, "कुटुंबीयांसोबत माझे वाद सुरू होते आणि एके दिवशी आमिरने मला फोन केला आणि माझी स्वाक्षरी हवी असं सांगितलं. मी वेडा असून स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही असं मी न्यायाधीशांसमोर म्हणावं असं मला सांगितलं गेलं होतं. ते असं का करत होते, मला माहित नाही. तेव्हाच मी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता." कुटुंबीयांनी जवळपास वर्षभर बळजबरीने मला औषधं दिली होती, असा आरोप फैजलने एका मुलाखतीत केला होता.

२००७ साली फैजल दोन दिवसांसाठी बेपत्ता झाला होता. भाऊ आमिर खानने मला नजरकैदेत ठेवल्याची तक्रार फैजलने बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी पोलिसांत केली होती. फैजलची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होतं.

हेही वाचा: 'भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस'; फैजलच्या व्हिडीओमुळे आमिर ट्रोल

आता आमिरसोबत कसं आहे नातं?

"माझ्यासोबत इतकी मोठी घडल्यानंतरही मी आमिरला माफ केलं. पण ती घटना मी कधीच विसरू शकत नाही. मी कुटुंबीयांशी फोनवर बोलतो, वाढदिवशी आणि ईदला त्यांना शुभेच्छा देतो. पण त्यांच्यापासून अंतर राखूनच राहणं मी पसंत करतो. त्यांनी भूतकाळात जे केलंय, त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी भीती आहे. म्हणूनच मला अंतर राखून ठेवायचं आहे. मला त्यांच्याशी काही तक्रार नाही, पण काही मला त्यांच्यापासून लांबच राहायचं आहे", असं फैजलने पुढे सांगितलं.

फैजल आणि आमिर खान हे 'मेला' या चित्रपटात एकत्र झळकले होते. आता अनेक वर्षांनंतर फैजल दिग्दर्शकाची धुरा सांभाळत आहे.

loading image
go to top