'दंगल'च्या प्रमोशनसाठी आमीर कोल्हापुरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

आमीरचा दंगल चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून, महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमीर देशभरात फिरत आहे.

कोल्हापूर - कुस्तीवर आधारित 'दंगल' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमीर खान आज (सोमवार) कोल्हापूरमध्ये आला होता.

कुस्ती पंढरी असलेल्या कोल्हापुरातील लाल मातीत ज्यांनी कुस्ती गाजवली, वाढवली अशा हिंदकेसरी दादू चौगुले व विनोद चौगुले यांच्या घरी तो गेला. तेथे त्याने त्यांच्याशी संवाद साधून कुस्तीविषयी चर्चा केली. या ठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

आमीरचा दंगल चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून, महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमीर देशभरात फिरत आहे. या चित्रपटाच आमीरने स्वतः एक गाणे गायले आहे. 

Web Title: Aamir Khan's Dangal movie promotion