"दंगल'ला नॉमिनेशन नाही? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

आमीर खानच्या "दंगल' चित्रपटाने बॉलीवूडमध्ये मनोरंजक दंगल केली. आमीरसह त्याच्या सहकलाकारांनीही उत्तम अभिनय केला आणि ते सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाले. या वर्षीच्या फिल्मफेअर ऍवॉर्डस्‌मध्ये तर "दंगल'ला चार पुरस्कार मिळाले. एवढेच नाही तर या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही दंगलमध्ये लहान गीता फोगटचे काम करणारी झायरा वसीम हिला सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला; पण एवढे सगळे होऊनही या वर्षीच्या आयफा ऍवॉर्डमध्ये "दंगल'ला साधे नॉमिनेशनही देण्यात आलेले नाही.

असे कसे झाले? असा प्रश्‍न आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी-कुंद्रा, क्रिती सनन, सुशांत सिंग राजपूत या कलाकारांना पडलाय. काही दिवसांपूर्वी हे कलाकार व्होटिंग करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की "दंगल' हा चित्रपट त्या यादीतच नाही. तेव्हा त्यांनी हा प्रश्‍न केला. आता हा चित्रपट नुकताच चीनमध्ये प्रदर्शित झाला. आयफाने असा निर्णय का घेतला असावा? किंवा हा त्यांचा काहीतरी गोंधळ तर नाही ना? 

Web Title: Aamir Khan's Dangal not nominated for IIFA Awards 2017?