
Main Ki Karan: आमीर खानच्या 'लाला सिंग चड्ढा' चित्रपटाचं नवं गाणं ऐकलंत काय ?
लाला सिंग चड्ढाच्या पहिल्या गाण्यांतर आता आमीरने प्रेक्षकांना आणखी एका नव्या गाण्याची रिलीजची माहिती दिलीआहे.चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रॅकचे 'मै की करा' हे गाणे रिलीज झाले आहेत.अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीताने आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गायनाने या गाण्याची निर्मिती झाली आहे.
या चित्रपटाचं पहिलं गाणं आमीर खानच्या एका टिझर व्हिडिओसोबत रिलीज झाले होते.तर या चित्रपटाचं दुसरं गाणं मै की करा साठी सोनू निगम,प्रीतम आणि त्यांच्या टीमसोबतचा एक 'बिहाइन्ड द सीन्स' व्हिडिओ रिलीज केलाय.अभिनेता आमीर खान आणि सोनू निगमने हे गाणं रेड एफ एमवरही हे गाणं लॉन्च केलंय.त्यावेळी ते या गाण्याविषयी सविस्तर बोललेसुद्धा.यावेळी सोनू निगमने सांगितले की,"प्रीतमने त्याला या गाण्यासाठी बोलावले व आमीरची हे गाणं मी म्हणावं अशी त्याची समजूत काढून दिली होती.आणि मी ते गाणं म्हटलं.मै की कराचा प्रवास चांगला होतो असे तो सांगतो."त्यामुळे निश्चितच दर्शकांकडून या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळणार आहे.
या गाण्यांचं विशेष म्हणजे आमीरने या गाण्याचं प्रदर्शन वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलाय.त्यामुळे त्याने अजूनही खरे गाणे प्रेक्षकांसमोर आणलेले नाही.(Aamir Khan)त्याच्या ऐवजी त्याने फक्त ऑडिओ जारी केलाय.आमीर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आमीरने अनेक चित्रपटात काम केले आहे.दंगल या चित्रपटातील त्याची उल्लेखनिय भूमिका आजही लोकांच्या चर्चेत असते.त्याच्या ११ ऑगस्टला येणाऱ्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.
Web Title: Aamir Khans Movie Laal Singh Chaddhas New Song Is Release Now Have You Heard It
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..