आमिरचे वेदनादायी परिवर्तन 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

आमिर त्याच्या बहुतेक चित्रपटांसाठी काही ना काही हटके करत असतो. त्याचे वेगवेगळे लूक्‍स आपल्याला प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळतात. "बॉलीवूडचा जॉनी डेप' असे त्याचे नामकरण केले तरी वावगे ठरणार नाही.

आमिरने त्याच्या आगामी "ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटासाठी नाक टोचले होते, हे आपण मध्यंतरी सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर पाहिलेच होते. नाक टोचल्यावर एक महिनाभर आमीरला त्याचा त्रास होत होता. तो एक महिना आमिर रात्री झोपू शकला नव्हता.

परंतु त्याने फक्त नाकच नाही; तर त्याचे कानही टोचले आहेत. एखाद्या राजस्थानी स्त्रीने घालावे तसे दागिने त्याने घातले आहेत. कानात बाळी तर त्याने "लगान' या चित्रपटासाठीही घातली होती; पण त्याने आता राजस्थानी स्टाईल बुगडीही घातली आहे. म्हणजे त्याचा हा त्रास किती वेदनादायक असेल, याची कल्पना आपण करूच शकतो. 

Web Title: Aamir's painful changes