रातोरात 'आशिकी'मुळे स्टार बनलेल्या राहुल रॉयला करावा लागला होता संघर्ष, इंडस्ट्रीबाबत केला असा खुलासा...

rahul roy
rahul roy

मुंबई- सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्यांचा संघर्ष खुलेआम सांगू लागले. अभिनेता राहुल रॉय १९९० मध्ये आलेल्या 'आशिकी' सिनेमानंतर खूप मोठा स्टार बनला. मात्र 'जुनून', 'सपने साजन के' आणि इतर काही सिनेमांना 'आशिकी' एवढी प्रसिद्धी मिळाली नाही. एका मुलाखती दरम्यान राहुलला विचारलं गेलं होतं की सिनेमांच्या अपयशानंतर इंडस्ट्रीमध्ये तुझ्यासोबत लोकांचं वागणं बदललं का?  यावर सहमती दर्शवत राहुल रॉयने इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले.

राहुलने सांगितलं, 'होय जेव्हा मी आशिकी हा सिनेमा केला तेव्हा मी करिअरच्या खूप उंचीवर होतो मात्र त्यानंतर जुनून किंवा इतर काही सिनेमे केले तेव्हा मी तेवढी उंची गाठू शकलो नाही. मी याचा स्विकार करतो. माझ्यात आणि माझ्यासोबत असलेल्या सहकलाकारांमध्ये अनेक बदल झाले आहेत. पण मी हे मनाला लावून घेतलं नाही.'

राहुलने पुढे सांगितलं की, 'मी अनेक अभिनेत्यांना पाहिलं, माझे सिनिअर्स जे त्या काळातील आहेत ते सोडून गेले आहेत. पण मला कधी कोणाच्या आधाराची गरज वाटली नाही.  मला माझ्या सहकलाकारांच्या संमतीची गरज नव्हती आणि नाही त्यांना माझी. मात्र मी त्यांच्यातील अनेक लोकांना भेटलो, त्यांच्याकडे काम मागितलं की माझ्यासाठी काही चांगलं असेल तर सांगा. जर नसेल तरी काही हरकत नाही.

'मी माझ्या मर्जीने या इंडस्ट्रीमधून निघून गेलो. यामध्ये इंडस्ट्रीचं काही देणं घेणं नाही. मी या इंडस्ट्रीत यासाठी नाही आलो की अभिनेता किंवा स्टार होणं माझं स्वप्न होतं. जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा मला भट्ट साहेबांनी सांगितलं होतं की राहुल आता या एकटेपणाच्या प्रवासाला तुझी सुरुवात होत आहे. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट मी गंभीरतेने घेतली.'

राहुल सांगतो की, 'जेव्हा मी ३० वर्षांचा झालो तेव्हा मला लग्न करायचं होतं. अभिनेता म्हणून हा खूप कठीण निर्णय होता. पण कुटुंबाच्या जबाबदा-या पार पाडत असताना सिनेमा करणं हे खूप कठीण असतं. कारण सिनेमा तुमच्याकडून खूप काही घेत असतो.जेव्हा मी २००० साली विवाह केला तेव्हा मी ब्रेक घ्यायचं ठरवलं आणि संपूर्ण वेळ माझ्या या नवीन नात्यासाठी द्यायचा निर्णय घेतला.' 

aashiqui fame rahul roy said after so many flop industry behavior change about me  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com