पापलेट फोटोशुट ; समुद्र किनारी आशका झाली दिवानी...

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

विशेषत कोरोनाच्या काळात कित्येक कलाकारांनी घरातच कशाप्रकारे व्यायाम व योगा करता येईल याचे धडे दिले होते.

मुंबई - फिटनेसचे धडे देण्यासाठी अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांना सुरक्षित आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व पटवून देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. विशेषत कोरोनाच्या काळात कित्येक कलाकारांनी घरातच कशाप्रकारे व्यायाम व योगा करता येईल याचे प्रात्यक्षिकांसह धडे दिले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता.

सध्या सोशल मीडियावर टेलिव्हिजन अभिनेत्री आशका गोराडियाचा फोटोशुट व्हायरल झाले आहे. तिचे ते फोटो पाहून त्यावर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. 

आशकानं आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. 
आशका गोराडियाने बॉयफ्रेंड ब्रैड गोब्‍लेसह 3 डिसेंबर 2017 ला विवाहबध्द झाली होती.

ख्रिश्चन आणि हिंदु दोन्ही पारंपरिक पद्धतीने तिचे लग्न झाले होते.चाहत्यांचे लक्ष वेधून घेणे त्यासाठी नवनवीन फोटो शेयर करणे हे तिला आवडते.

 

विशेषत तिचे योगा करतानाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. त्यापैकी एखाद्या फोटोवर क्लिक केल्यास त्यापुढील फोटो पाहण्याचा मोह काही केल्या आवरत नाही.

 

टेलिव्हिजनवर आपल्या कामानं सर्वांना जिंकून घेणारी आशकाचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. तिनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 

 
 ‘अचानक 37 साल बाद’ मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

 

 एक्टिंग-एक्टिंग, बिग बॉस , बाल वीर, नच बलिए आणि कुसुम , क्योंकि सास भी कभी बहू थी आणि नागिन अशा अनेक मालिकांमध्ये झळकली होती.

आशकाचा जो फिटनेस आहे त्यात तिनं योगाला सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे, त्यामुळे इतरांनाही योगा करण्याचा सल्ला देत असते.  

सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा करतानाचे फोटो सर्वाधिक आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aashka goradiya hot photoshoot sea beach yoga pose viral on social media