'बबिताचं' हटके ड्रेसिंग; 'बाबा निरालाची' उडाली झोप... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'बबिताचं' हटके ड्रेसिंग; 'बाबा निरालाची' उडाली झोप...
'बबिताचं' हटके ड्रेसिंग; 'बाबा निरालाची' उडाली झोप...

'बबिताचं' हटके ड्रेसिंग; 'बाबा निरालाची' उडाली झोप...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - ज्या वेबसीरिजनं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली अशा आश्रम या मालिकेचा पुढील सीझन येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेचं ज्याठिकाणी शुटींग सुरु होतं त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. तो वाद एवढा टोकाला गेला की, त्यामुळे या मालिकेच्या दिग्दर्शक प्रकाश झा यांनाही मारहाण करण्यात आली होती. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटल्याचे दिसून आले होते. आता या मालिकेतील लोकप्रिय व्यक्तिरेखा बबिताचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

एम एक्स प्लेयरवर आश्रम ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्याच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी प्रतिसाद केले होते. आता त्याच्या तिसऱ्या सीझनची तयारी सुरु झाली आहे. आश्रममध्ये बबिताची भूमिका त्रिशा चौधरीनं केली होती. त्या भूमिकेनं तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून दिली. त्रिशाला सोशल मीडियावरही चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. आता तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे आश्रम मालिकेतील बाबा निरालाची झोप उडाली...अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्याच्या दिसून आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आश्रम नावाच्या मालिकेच्या पुढील सीझनची चर्चा आहे.

त्रिशाच्या त्या फोटोंन सोशल मीडियावर कमाल केली आहे. त्याला चाहत्यांना हजारो लाईक्स आणि कमेंट्सही दिल्या आहेत. त्रिशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. तिनं आता इंस्टावर जो फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं जे कपडे परिधान केले त्याची चर्चा सुरु झाली आहे. काही युझर्सनं तिला प्रतिक्रिया दिल्या आहेत की, बाबा निराला यांची या फोटोंनं झोप उडाली असेल....2016 मध्ये त्रिशानं दहलीज नावाच्या एका मालिकेतून मनोरंजन विश्वामध्ये पाऊल ठेवले होते.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

loading image
go to top