आयुषमान भव अविनाश! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

कलाकार नेहमीच पडद्यावर तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी आपलं वजन घटविताना दिसतात. तसंच लाईफ ओके वाहिनीवरील "आयुषमान भव' या मालिकेत अभिनेता अविनाश सचदेव, नीरज रघुवंशी या पंचवीस वर्षीय तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या मालिकेत पंचवीस वर्षांचा तरुण दिसण्यासाठी तो वजन घटवणार आहे. आतापर्यंत त्याने आठ किलो वजन कमी केलं आहे. याबाबत तो सांगतो, की मला भूमिकेसाठी स्वतःमध्ये बदल घडवायला आवडतं. अनेक कलाकार चित्रपटातल्या भूमिकेसाठी आपलं वजन कमी करतात किंवा वाढवतात. मग छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही तसं केलं तर बिघडलं कुठे? त्यामुळे मला जेव्हा कळलं, की "आयुषमान भव' या मालिकेत पंचवीस वर्षीय तरुणाची भूमिका साकारायची आहे, तेव्हा मी वजन घटवायला सुरुवात केली. आता तीन महिन्यांत मी आठ किलो वजन घटवलं आहे. त्याचे हे विचार ऐकून त्याला आयुषमान भवं असंच म्हणावंसं वाटतंय. 

Web Title: AayushmanBhav Avinash!