Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan मधनं आयत्यावेळी काढून टाकला अब्दू रोझिकचा सीन.. सलमानची पर्वा न करता सिंगरनं खुलासा केलाच Abdu Rozik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdu Rozik

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan मधनं आयत्यावेळी काढून टाकला अब्दू रोझिकचा सीन.. सलमानची पर्वा न करता सिंगरनं खुलासा केलाच

Abdu Rozik : तजाकिस्तानचा गायक अब्दु रोझिक याला सलमान खानच्या 'बिग बॉस १६' च्या रिअॅलिटी शो मधून मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानं आपल्या वागणुकीनं सर्वांचे मन जिंकले होते. सलमान खाननं स्वतः अब्दूची बिग बॉसच्या घरातील पहिला सदस्य म्हणून ओळख करुन दिली होती.

शो लॉंच होताना सांगितलं गेलं होतं की अब्दु 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे,पण २१ एप्रिल २०२३ रोजी सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज झाला तेव्हा मात्र स्क्रीनवर कुठेच दिसला नाही. आता त्यानं असं कसं घडलं याविषयी खुलासा केला आहे.(Abdu Rozik Scenes were removed from salman khan kisi ka bhai kisi ki jaan, whats the reason behind that.)

अब्दूनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, ''सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून त्याच्या सीनला एडिट केलं गेलं कारण जसा हवा होता तसा सीन झाला नव्हता''.

जगातील सगळ्यात छोट्या गायकानं खुलासा केला आहे की,'किसी का भाई किसी जान' सिनेमातील त्याच्या सीनला मेकर्सना पुन्हा शूट करायचे होते पण त्याच्यासाठी चार दिवस आणखी लागणार होते. पण त्यावेळी अब्दू आधीपासूनच बिग बॉस १६ च्या घरात होता. नियमांनुसार सदस्याला घराच्या आत आल्यानंतर शो सोडता येत नाही.

पण शो मधून बाहेर आल्यानंतर मात्र अब्दूचे तारे चमकले आहेत. त्याचे कितीतरी म्युझिक व्हिडीओज रिलीज झाले आहेत. त्यानं मुंबईत आपलं हॉटेल देखील ओपन केलं आहे. सध्या बोललं जात आहे की अब्दूला 'खतरों के खिलाडी १३' मध्ये पाहिलं जाईल.

जेव्हा 'किसी का भाई किसी की जान' रिलीज झाला होता तेव्हा अब्दू रोझिकनं पापाराझी आणि चाहत्यांसोबत सिनेमा पाहण्यासाठी पूर्ण थिएटर बूक केलं होतं. आता बातमी समोर येतेय की अब्दूला रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी सिझन १३' साठी संपर्क साधला गेला आहे आणि तो लवकरच त्या शो मध्ये एन्ट्री करेल पण एक गेस्ट म्हणून स्पर्धक म्हणून नाही.