ABG Fraud: २२ हजार कोटींवर नेमके किती शुन्य? केदार शिंदेंचा सवाल

ABG Fraud Case Updates
ABG Fraud Case Updates

गुजरातमध्ये बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला. एबीजी (ABG) शिपयार्ड या कंपनीने देशातील २८ बँकांची फसवणूक करत तब्बल २२ हजार ८४२ कोटींचा गंड्डा लावला. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी नरेंद्र मोदींवर धक्कादायक आरोप केला.

हे प्रकरण २०१८ चे आहे, असे सांगत एबीजी शिपयार्डवर कारवाई करण्यास सरकारला पाच वर्षे का लागली, असा सवाल रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला, सोबत 2007 मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुख्यमंत्री असताना गुजरात सरकारने एबीजी शिपयार्डला 1,21,000 चौरस मीटर जमीन दिली होती, असा आरोपही त्यांनी केला. (ABG Fraud Case Updates)

22 हजार कोटींच्या घोटाळ्यावर केदार शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. “22 हजार कोटी? म्हणजे नेमके किती शुन्य? एवढा बॅंक fraud करून त्या लोकांनी गुजरातमधून पलायन केलं. साधं घर घ्यायचं तर सामान्य माणसाला हे बॅंकवाले एवढं पेपरवर्क करायला लावतात. त्यात जे घर आहे ते पण तारण ठेवतात. नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?” असं केदार शिंदे म्हणाले आहेत.

एबीजी शिपयार्ड कंपनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचे काम करते. हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 या कालावधीतील असल्याचे तपासात समोर आले. बँकांकडून ज्या कारणासाठी कर्ज घेण्यात आले त्यासाठी त्याचा वापरच केला गेला नसल्याचे व ही रक्कम अन्यत्र वळवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संचालकांनी संगनमत करून बँकांची फसवणूक केल्याचे सबळ पुरावे हाती लागल्याने कारवाईचे पुढचे पाऊल उचलले गेले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com