"अभी तो हम...' 28 फेब्रुवारीला रंगभूमीवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई : मुलांना नकोशा झालेल्या आई-वडिलांना अखेर वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. या विषयावर आधारित "अभी तो हम जवान है' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मंगळवारी (28 फेब्रुवारी) रात्री 8 वाजता दादर येथील शिवाजी मंदिरला होत आहे. निर्माती सुनंदा अनंत निर्मित या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे 40 ते 75 वयाच्या 25 कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या सर्व कलाकारांना नाटकाची एबीसीडी माहीत नसतानाही त्यांनी नाटकाची धुरा सांभाळली आहे.

मुंबई : मुलांना नकोशा झालेल्या आई-वडिलांना अखेर वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. या विषयावर आधारित "अभी तो हम जवान है' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मंगळवारी (28 फेब्रुवारी) रात्री 8 वाजता दादर येथील शिवाजी मंदिरला होत आहे. निर्माती सुनंदा अनंत निर्मित या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे 40 ते 75 वयाच्या 25 कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या सर्व कलाकारांना नाटकाची एबीसीडी माहीत नसतानाही त्यांनी नाटकाची धुरा सांभाळली आहे. श्री महाकाली चित्र, श्री स्वामी समर्थ निर्मित आणि प्रौढ नाट्य कार्यशाळा संचालित, रमेश वारंग लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक पाहणाऱ्या 40 वयाच्या पुढच्या प्रेक्षकांना तरुण झाल्याचा व तरुणांना बालपणात रमल्याचा अनुभव येईल, असा विश्‍वास दिग्दर्शकाने व्यक्त केला. यात विजय ठाकरे, आरती परब, रश्‍मी आगास्कर, नंदिनी पाखरे, स्वाती जठार, हेमंत घाडगे, कश्‍यप कांबळे, अजित काटे, रवींद्र जाधव, विद्या सातघरे, रवींद्र सर्वटे, श्रीराम आठले, संजय आहिरे, किशोर शेट्ये, दयाराम जाधव, मीनाक्षी कोंढाळकर, धर्मा कांबळे, विनया तळेकर, वैजयंती कोकणे, प्रिया विसपुते, पांडुरंग सर्जिणे, रश्‍मी सहस्रबुद्धे आणि रमेश वारंग यांच्या भूमिका आहेत.  

Web Title: Abhi to hum 28 Feb On Stage