विकएंडला मी मुंबईबाहेर जाणं पसंत करते

abhidnya bhave actress
abhidnya bhave actress

माझ्यासाठी विकएंड म्हणजे बिझी शेड्यूलमधून मिळालेला निवांत वेळ. विकएंडला मी बहुधा मुंबईबाहेर जाणं पसंत करते. माझं एक प्रामाणिक मत आहे की, आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून स्वतःसाठी आपण काहीसा वेळ काढला आणि त्या वेळात आपल्या आवडत्या जागी भटकंती केली की, आपण रिफ्रेश होतो.

पुढील काम करण्यास नवीन उत्साह आपल्यामध्ये निर्माण होतो. त्यामुळे कधीही विकएंड महत्त्वाचाच. मुंबईबाहेरील ज्या प्रेक्षणीय स्थळांवर मी कधी गेले नाही अशा ठिकाणी मी जाते. मित्र-मैत्रिणी, कुटुंबाबरोबर मी माझा विकएंड साजरा करते. माझा आताचाच विकएंड म्हणजे माझा वाढदिवस. माझा वाढदिवस १३ मार्चला होता. या दिवशी आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र जमलो होतो. हे छोटंसं सेलिब्रेशन मला आनंद देणारं ठरलं. मला माझ्या कामामधून जरासा वेळ मिळाला कीस मी नाशिक, महाबळेश्‍वरसारख्या ठिकाणीही जाते. मी मुळशीलाही जाऊन आले आहे.

निसर्गरम्य वातावरणात मला वेळ घालवायला आवडतो. प्रत्येक विकएंडला बाहेर जाण्याची माझी जागा काही ठरलेली नसते. कामाच्या गडबडीमध्ये प्रत्येक आठवड्याला बाहेर जाणं शक्‍यही नसतं. पण वेळ मिळेल तसं मी वेगवेगळ्या ठिकाणी जाते. आता विकएंडसाठी एक माझी हक्काची जागा तयार झाली आहे, ती म्हणजे तळेगाव. मी तळेगावला माझं स्वतःच घर घेतलं आहे. त्यामुळं आता निवांत वेळ घालवायचा असेल की, मी लगेचच तळेगावला जाते.

(शब्दांकन -काजल डांगे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com