'डोनाल्ड ट्रम्प हे माझे तात्या' किचन कल्लाकार मध्ये अभिजित बिचुकलेचा कल्ला

किचन कल्लाकारच्या मंचावर अभिजीत बिचुकले सहभागी झाले होते.
abhijeet bichukale said doland trump is tatya on kitchen kallakar set
abhijeet bichukale said doland trump is tatya on kitchen kallakar set sakal

abhijeet bichukale : झी मराठीवरील (zee marathi) ‘किचन कल्लाकार’ (kitchen kallakar) हा कार्यक्रम सध्या गाजत आहे. या कार्यक्रमात केवळ कलाकारच नाही तर विविध क्षेत्रातील मंडळी हजेरी लावतात. विशेष म्हणजे राजकारणातील दिग्गज व्यक्तीं या कार्यक्रमात येऊन धमाल करतात. राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाजू या कार्यक्रमाने समोर आणल्या आहेत. जेवण बनवणे, खेळ खेळणे आणि पडद्यामागच्या गप्पांमधून थट्टा मस्करी करणे असा काहीसा बाज या कार्यक्रमाचा आहे. या मंचावर यंदा अशी एक आसामी येणार आहे जिथे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलय. केवळ मुख्यमंत्रीच नाही तर स्वतःला पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाचे दावेदार समजणारे अभिजीत बिचुकले 15 जूनच्या भागात आपल्या भेटीला येणार आहेत. (abhijeet bichukale said doland trump is tatya on kitchen kallakar set)

abhijeet bichukale said doland trump is tatya on kitchen kallakar set
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा.. हेमांगी कवीची सणसणीत पोस्ट

अभिजित बिचुकले हे नाव प्रेक्षकांना काही नवीन नाही. बिचुकले म्हंटलं की सगळ्यात पहिला डोक्यात विचार येतो तो म्हणजे अफाट मनोरंजन. बिचुकले यांचे व्यक्तिमत्व हे प्रेक्षकांना रंजकपणे कोपरखळी देणारं आहे. बिचुकले टीव्हीवर आले की ते आता काय कल्ला करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. लवकरच बिचुकले टीव्हीवर येऊन कल्ला करणार आहेत. हो हे खरं आहे पण ते कल्ला करणार आहेत किचन कल्लाकारच्या किचनमध्ये. अभिनेता जयवंत वाडकर आणि तृप्ती देसाई यांच्याबरोबर अभिजित बिचुकले यांची पाककलेची चुरस रंगणार आहे. नेहमीच वादाच्या गराड्यात अडकले बिचुकले पाककलेचे कसोटीत काय रंगत आणणार हे बघण्यासारखे आहे. या भागात बिचुकले यांनी अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प विषयी महत्तावाचे विधान केले.

यावेळी अभिजीत यांना एक खेळ दिला होता. या खेळात अभिजीत यांच्यासमोर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो ठेवण्यात आला. यावेळी ट्रम्प यांचा फोटो पाहताच बिचुकले म्हणाले, हे तर आमचे तात्या.. आमच्या गावाकडचे. अत्यंत हुशार आणि चांगला माणूस.' असे विधान त्यांनी ट्रम्प यांच्याविषयी केले. याशिवाय त्यांच्या ठरलेल्या शाब्दिक प्रहाराने मंचावर हास्याची खसखस पिकवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com