esakal | Indian Idol विजेता अभिजीत सावंतने बक्षिसाच्या रकमेचं काय केलं?
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijeet Sawant

'इंडियन आयडॉल' विजेता अभिजीत सावंतने बक्षिसाच्या रकमेचं काय केलं?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गायक अभिजीत सावंत Abhijeet Sawant 'इंडियन आयडॉल'च्या Indian Idol पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता. या शोमुळे अभिजीला पैसा, प्रसिद्धी सर्वकाही मिळालं. मात्र तरीही कामातून समाधान मिळालं नसल्याची खंत त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवली. 'इंडियन आयडॉल'चा विजेता ठरल्यानंतर त्याला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचं काय केलं, याबद्दलही त्याने सांगितलं. लेखक चेतन भगतला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, "सुटकेस आणि कार हेच माझं जग बनलं होतं. दररोज विविध शो करण्यासाठी मी प्रवास करायचो. माझ्या कामाचं वेळापत्रक इतकं व्यग्र होतं की मी घराच्या खालीच कारमध्ये काही तास झोपायचो. त्यानंतर पुढच्या शोसाठी पुन्हा विमानतळाकडे निघायचो."

बक्षिसाच्या रकमेचं काय केलं, याबद्दल तो पुढे म्हणाला, "मी चांगली गुंतवणूक केली होती. तो मंदीचा काळ होता, त्यामुळे इथे-तिथे मी बरेच पैसे गुंतवले होते. मी स्वत:चं घरसुद्धा विकत घेतलं आणि गाडीसुद्धा घेतली होती. पण त्यावेळी मी पैशांसाठी काम करत होतो आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी खंत आहे. कदाचित हे माझे विचार असतील, पण जेव्हा तुम्ही पैशांसाठी काम करता, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टींशी तडजोड करावी लागते. तुमची प्रतिभा, तुमचं संगीत, तुमचं ज्ञान या गोष्टींशी तुम्हाला तडजोड करावी लागते. इंडस्ट्रीत दिखाव्याला खूप महत्त्व असतं. मनगटाला नीट बसत नसतानाही मी अत्यंत महागडं रोलेक्सचं घड्याळ खरेदी केलं होतं."

हेही वाचा: माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

अभिजीतने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत 'इंडियन आयडॉल'वर टीका केली होती. 'बॉलिवूड लाइफ'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "कार्यक्रमात गाण्यांव्यतिरिक्त जे काही दाखवलं जातं, त्याची मर्यादा आमच्या सिझनमध्ये फार कमी होती. पण सध्याच्या सिझनमध्ये त्याच एक्स्ट्रा एलिमेंट्सना जास्त महत्त्व दिलं जातंय. त्यांनी स्पर्धकांना आव्हानात्मक काम दिलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही गाण्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींवर अधिक भर देता, तेव्हा गायनाचा दर्जा खालावत जातो. अशा रिअॅलिटी शोमध्ये गायनावर अधिक भर दिला पाहिजे."

loading image
go to top