अक्षय नव्हे; तर अभिषेकच? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

सुपरस्टार कमल हसन यांच्या "इंडियन 2' चित्रपटात बॉलीवूडमधील एक सुप्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगताहेत.

सुपरस्टार कमल हसन यांच्या "इंडियन 2' चित्रपटात बॉलीवूडमधील एक सुप्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगताहेत.

"2.0' चित्रपटातील खिलाडी अक्षयकुमारची भूमिका पाहता "इंडियन 2'मध्येही तोच नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. पण आता अक्षय नव्हे; तर अभिषेक बच्चनला कमल हसन यांच्याबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

"2.0' चित्रपटानंतर दिग्दर्शक शंकर यांचा हा चित्रपट महत्त्वपूर्ण असणार आहे. या चित्रपटाचा ज्युनियर बच्चनही महत्त्वाचा भाग असून तो यात नकारात्मक भूमिकेत दिसेल. मात्र याबाबत अद्यापही कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अभिषेक "इंडियन 2'मध्ये काम करणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य असेल तर त्याच्यासाठी ही मोठी लॉटरीच आहे, असं म्हणावं लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhishek Bacchan works with Kamal Hasan