अभिषेक इज बॅक !

abhishek to work in new film
abhishek to work in new film

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेक 'मनमर्जियां' चित्रपटानंतर एकाही हिंदी चित्रपटात झळकला नाही. पण आता तो परतला आहे. एका दमदार चित्रपटासह तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द बिग बूल' असं या चित्रपटाचं नाव असून अभिषेकने चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे.

अजय देवगण याचं निर्मितीकरण करणार आहे तर, दिग्दर्शन कूकी गुलाटी करणार आहेत. अभिषेक मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये इलियाना डिक्रुजही असणार आहे. विशेष म्हणजे ती अभिषेकच्य़ा विरोधामध्ये भूमिका साकरणार आहे.त्यासोबत इलियाना डिक्रुजही दिसणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे. 'बोल बच्चन' नंतर या चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि अभिषेक एकत्र काम करणार आहेत.

चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचा एक फोटो अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे. फोटोसा कॅप्शन देताना त्याने लिहिलं आहे की, "एक नवीन प्रवास, नवी सुरुवात. तुमच्या आर्शिवादाची गरज आहे. अभिषेकच्या 'मनमर्जियां' चित्रपटाने तिकिटबारीवर चांगलीच गर्दी केली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here we go! A new journey, a new beginning. Need your best wishes. @ajaydevgn #KookieGulati @anandpandit

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com