अभिषेक बच्चनने 'बॉब बिस्वास'साठी वाढवलं चक्क एवढं वजन, बंगाली भाषेचंही घेतलं ट्रेनिंग

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 6 January 2021

वजन वाढीव दिसण्यासाठी अभिषेकने प्रोस्थेटिकची मदत घेतली नाही. उलट त्याने स्वतः मेहनत घेऊन वजन वाढवलं आहे.

मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनच्या आगामी सिनेमा 'बॉब बिस्वास'चं शूटींग पूर्ण झालं आहे. सुजॉय घोषच्या बाऊंट स्क्रीप्ट प्रोडक्शनसोबत रेड चिलीज एंटरटेन्मेंटद्वारे निर्मित 'बॉब बिस्वास'चं शूटींग कोलकातामध्ये ४३ दिवस सुरु होतं. या सिनेमाचं शूटींग ४२ वेगवेगळ्या लोकेशन्सवर करण्यात आलं. या भूमिकेसाठी अभिषेकने १२ किलो वजन वाढवलं. तसंच बंगाली भाषा शिकण्यासाठी दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्याकडून ट्रेनिंग देखील घेतली. या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत आहे.   

हे ही वाचा: बापरे! एवढ्या कोटींमध्ये विकले गेलेसलमान खानच्या 'राधे' सिनेमाचे हक्क  

'बॉब बिस्वास' सुजॉयच्या 'कहानी' या सिनेमाचा स्पिन ऑफ आहे. एका वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चने या भूमिकेत जीव ओतून मेहनत केली आहे. याचं खास कारण म्हणजे विद्या बालनच्या 'कहानी' सिनेमात बंगाली अभिनेता शाश्वत चॅटर्जीने हे पात्र खूप प्रसिद्ध केलं होतं. हा सिनेमा सुजॉय घोषचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा आहे. यावर जवळपास ८० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. 

रिपोर्ट्सनुसार, 'बॉब बिस्वास' या सिनेमात बिस्वासच्या आयुष्यातील ट्रॅजेडी देखील दाखवली जाईल. वजन वाढीव दिसण्यासाठी अभिषेकने प्रोस्थेटिकची मदत घेतली नाही. उलट त्याने स्वतः मेहनत घेऊन वजन वाढवलं आहे. सिनेमात रिक्रिएटेड गाणी नाहीयेत आणि ओरिजनल देखील नाहीयेत. बॅकग्राऊंडमध्ये बांग्ला फोक गाण्यांची एखादी ओळ ऐकायला मिळू शकते. 

Abhishek Bachchan looks unrecognisable as he transforms into Bob Biswas for  shoot | Pics | Celebrities News – India TV

सिनेमाच्या आवाढव्य खर्चामुळे सुजॉयला त्याच्या बॅनरचा आणखी एक सिनेमा 'ब्लाईंड'मध्ये कॉस्ट कटिंग करावी लागत आहे. सध्या ग्लासगोमध्ये याचं शूटींग सुरु आहे. तिथे भारतातून क्रु मेंबर म्हणून केवळ टीममधील एक सदस्य गेला आहे. बाकीची टेक्निकल टीम तिथूनंच भाडेतत्वावर घेतली आहे. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झालं होतं. जर लॉकडाऊन नसतं तर हा सिनेमा २०२०च्या सुरुवातीलाच रिलीज झाला असता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे सगळं काही ठप्प झालं आणि त्यानंतर टीमने नोव्हेंबर महिन्यात पुन्हा शूटींगला सुरुवात केली होती.   

abhishek bachchan raised 12 kg weight for bob biswas and takes training from sujoy ghosh for bengali accent  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek bachchan raised 12 kg weight for bob biswas and takes training from sujoy ghosh for bengali accent