लॉकडाऊनमध्ये वाढल्या अभिषेकच्या 'या' भूमिकेतील अडचणी, चूक झाल्यास झाली असती मोठी गडबड

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 1 December 2020

काही दिवसांपूर्वी या सेटवरील शूटींग दरम्यानचे अभिषेकच्या लूकचे फोटो व्हायरल झाले तेव्हा अभिषेकचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या फोटोंमध्ये ज्युनिअर बच्चनला ओळखणं कठीण होतं. मात्र तेवढंच कठीण होतं या पात्रात बसणं.

मुंबई- अभिषेक बच्चन सध्या कोलकातामध्ये त्याच्या आगामी 'बॉब बिस्वास'चं शूटींग करतोय. जेव्हा काही दिवसांपूर्वी या सेटवरील शूटींग दरम्यानचे अभिषेकच्या लूकचे फोटो व्हायरल झाले तेव्हा अभिषेकचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या फोटोंमध्ये ज्युनिअर बच्चनला ओळखणं कठीण होतं. मात्र तेवढंच कठीण होतं या पात्रात बसणं. कारण या भूमिकेसाठी अभिषेकने त्याचं वजन थोडं वाढवलं आहे.  

हे ही वाचा: गौहर आणि जैद 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, वेडिंग कार्डची चर्चा  

लॉकडाऊन सुरु होण्याआधी अभिषेक त्याच्या 'बॉब बिस्वास' सिनेमाचं शूट कोलकातामध्ये करत होता. मात्र अचानक त्याचा शूटींग बंद करावं लागलं. लॉकडाऊनमध्ये अभिषेकसमोर हे खूप मोठं आव्हान होतं की त्याला लॉकडाऊन संपल्यावर पुन्हा तिच भूमिका साकारायची आहे आणि यासाठी त्याला तसंच राहायचं होत जसं सिनेमात दिसणं गरजेचं आहे. जेव्हा चारही बाजूंनी अव्यवस्था सुरु झाली तेव्हा अभिषेकला त्याचं वजन मेंटेन ठेवणं खूप कठीण होतं. 

अभिषेक बच्चन

या सिनेमातील लूकबाबत एका मुलाखतीत अभिषेकने सांगितलं की त्याला सगळीकडून यासाठी चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्याप्रमाणे लोकांमध्ये चर्चा होतेय आणि त्याचा लूक पाहून प्रतिसाद मिळतोय त्या हिशोबाने अभिषेकला वाटतंय की कदाचित त्याने काही तरी चांगलं काम केलं आहे. अन्नपुर्णा घोष यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 'बॉब बिस्वास' हा सिनेमा एक क्राईम थ्रिलर आहे ज्याचं मुख्य पात्र २०१२ मध्ये आलेल्या सुजॉय घोषचा सिनेमा 'कहानी'पासून प्रेरित आहे.   

abhishek bachchan says he had to gain weight for the role in bob biswas  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhishek bachchan says he had to gain weight for the role in bob biswas