'अमिताभ यांना वाटतं त्यांचा मुलगा...' तस्लिमा नसरीन यांची बोचरी टीका! अभिषेकचं सणसणीत उत्तर |Abhishek Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhishek Bachchan

Abhishek Bachchan: 'अमिताभ यांना वाटतं त्यांचा मुलगा...' तस्लिमा नसरीन यांची बोचरी टीका! अभिषेकचं सणसणीत उत्तर

Abhishek Bachchan won Dasavi Best film actor: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. आतापर्यत अभिषेकची एका गोष्टीसाठी नेहमीच चर्चा होत राहिली. ती म्हणजे अमिताभजी आणि त्याची होणारी तुलना. अभिषेकवर सध्या कौतूकाचा वर्षाव होत असून त्याचे कारणही खास आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या लेकाचे सोशल मीडियावर खास शब्दांत कौतूक केले आहे. त्याचे कारण म्हणजे अभिषेकच्या दसवी या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. त्यात त्यानं जी एका अडाणी राजकारण्याची भूमिका साकारली होती. त्याला यंदाचा फिल्मफेयर ओटीटी पुरस्कार मिळाला आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिषेकच्या वाट्याला एखादा पुरस्कार आला आहे. त्यामुळे त्याचे होणारे कौतूकही मोठे आहे.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

अमिताभ यांनी तर खास पोस्ट शेयर करत अभिषेकचं कौतूक केलं आहे. त्यात ते म्हणाले होते की, मला माहिती आहे अभिषेकवर खूप टीका झाली आहे. मात्र खचला नाही. त्याची कायम तुलनाच होत राहिली. यावर त्यानं त्याच्या कामानं उत्तर दिलं आहे. आता वेळ त्याच्या कौतूकाची आहे. अभिषेक मला तुझा अभिमान आहे. तुला मिळालेल्या पुरस्कारासाठी तुझे खूप कौतूक. असे अमिताभ यांनी म्हटले आहे.

यासगळ्यात वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक पोस्ट शेयर करत अभिषेकची खिल्ली उडवली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. तस्लिमा यांनी लिहिले आहे की, अमिताभ यांना आता असं वाटतं की, सारं टँलेंट त्यांच्या मुलामध्ये आले आहे. आणि त्यांचा मुलगा बेस्ट आहे. अभिषेक चांगला आहे. मात्र मला वाटत नाही की, तो त्याचे वडील अमितजी यांच्याइतका टँलेट आहे. नसरीन यांच्या त्या पोस्टला अभिषेकनंही खणखणीत उत्तर दिले आहे.

हेही वाचा: Deepika Padukone : दीपिकाच्या 'त्या' बिकिनीची किंमत माहितंय का?

मॅडम तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मीच काय आणखी कुणीही त्यांच्याजवळही जाऊ शकत नाही. ते नेहमीच ग्रेट होते आणि राहतील. आणि मला खूप गर्व आहे की, मी त्यांचा मुलगा आहे. यावर त्यानं हात जोडल्याचा इमोजीही शेयर केला आहे. अभिषेकच्या उत्तराचे सोशल मीडियावरुन कौतूक होताना दिसत आहे.