डॅशिंग अक्षयचा वाघासोबतचा थ्रीलिंग व्हिडीओ पाहिलात का?

सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बॉलीवूडच्या खिलाडीला केली फर्माईश...
Akshay Kumar
Akshay KumarGoogle

अक्षय कुमार(Akshay Kumar) हा बॉलीवूडचा अॅक्शन हिरो. त्याच्या बहुतांशी सिनेमात खतरनाक स्टंट्स तो स्वतः करतो. मार्शल आर्टमध्ये मास्टर असलेल्या अक्षयचे अॅक्श सीक्वेन्स खतरनाक. खिलाडी अक्षय म्हणून उगाच काही त्याची बॉलीवूडमध्ये ओळख बनलेली नाही काही. आपल्या करिअरच्या सुरुवातीला अॅक्शन सिनेमे करुन त्यानं आपली एक ओळख निर्माण केली अन् मग विनोदी सिनेमातही त्यानं आपला अभिनय आजमावला आणि यशही मिळवलं. पण तरीही विनोदी भूमिका करणाऱ्या अक्षयपेक्षा फायटिंग करणारा अक्षय आजही वयाची पन्नाशी पार करूनही विशीतल्या मुलींना हॉट वाटतो. बरं हे सगळं सांगायचं कारण इतकंच की अशाच आपल्या डॅशिंगअक्षय कुमारचा वाघासोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काय आहे त्या व्हिडीओत नेमकं....सविस्तर वाचा आणि बातमीत जोडलेला व्हिडीओही पहा.

सध्या कोरोनामुळे सिनेमाचं शुटिंग बंद आहे. प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे अनेक कलाकार फॅमिली सोबत व्हॅकेशन एन्जॉय करीत आहेत. आपला खिलाडी अक्षय कुमारही आपल्या फॅमिलीला घेऊन राजस्थानला गेलाय. तिथं त्यानं रणथंबोरच्या जंगल सफारीचा आनंद घेतला. तिथेच त्याचा सामना झाला जंगलच्या राजाशी. आता सफारीदरम्यान व्याघ्र दर्शन होणं म्हणजे अहो भाग्य. पण बहुधा जंगलच्या राजालाही बॉलीवूडचा खिलाडी आपल्याला पहायला आलाय तर देऊया दर्शन असं वाटलं असेल अन् त्यानं अक्षयला अगदी जवळून दर्शन दिलं बरं का.

Akshay Kumar
'संजयला जेल झाली अन् 'खलनायक' सुपरहीट झाला';सुभाष घई असं का म्हणाले?

स्वतः अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो व्हिडीओ पोस्ट केलाय. अनं त्याला छानसं कॅप्शनही दिलंय. त्यानं लिहिलंय,''सोने पे सुहागा माँगा था, ये तो उस से भी बढ़ कर हो गया. Absolutely fascinated to see this majestic beauty today. Mission Ranthambore accomplished. Copy that !'' या त्याच्या व्हिडीओ पोस्टवर त्याच्या चाहत्यांनीही भरपूर कमेंट्स केल्या आहेत. एक लक्षवेधी कमेंट अशी आहे की,'वाघासोबतही एक सिनेमा लवकरच होऊन जाऊ दे तुझा'... ही आणि अशा अनेक कमेंट्स वाचनीय आहेत. लोकांनाही त्यानं रणथंबोरमध्ये जंगल सफारीचा आनंद घेण्यास सांगितलं आहे. आता 'चलो, बॅग भरो निकल पडो!' म्हणत फॅन्सही जातील राजस्थानला तर नवल नव्हे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com