'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'चा फर्स्ट लूक रिलिज

रविवार, 8 एप्रिल 2018

'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हे डॉ. मनमोहनसिंग यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणारे व त्यांचे मिडीया अॅडवाइर संजय बारु यांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल.

लवकरच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या जीवनावर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. जेष्ठ अभिनेते अनुपम खेर डॉ. मनमोहनसिंग यांच्या भुमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातून विजय रत्नाकर गुट्टे हे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हे डॉ. मनमोहनसिंग यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणारे व त्यांचे मिडीया अॅडवाइर संजय बारु यांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल. या सिनेमाचं नाव देखील 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' असेच आहे. 

नुकताच सिनेमाचा फर्स्ट लूक रिलिज करण्यात आला आहे. अनुपम खेर यांनी सिनेमाचा फर्स्ट लूक आपल्या ट्विटर हँन्डलवरुन शेअर केला. खेर यांची वेशभूषा तर डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखी आहेच पण त्यांचे हावभाव अगदी सारखे असल्याचे दिसून येईल. 

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही हुबेहुब भूमिका साकारताना या सिनेमात जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नर्ट हिला बघणार आहोत. सुझेन हिने या पुर्वीही काही हिन्दीतील टि. व्ही. शो आणि सिनेमात काम केले आहे. तर प्रियंका गांधी यांची भूमिका 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या वादग्रस्त सिनेमातील अभिनेत्री आहना कुम्रा ही साकारणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: The Accidental Prime Minister Movies First Look Out