आमीरच्या 'महाभारतावर' 'तांडव'; वेबसीरिची निर्मिती होणार नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 2 March 2021

काही दिवसांपूर्वी आमीर आणि अनुष्का शर्मा यांनी मा आनंद शीला यांच्यावर आधारित एक मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई - लाल चढ्ढा सिंग चित्रपटामध्ये व्यस्त असणा-या आमीरनं आपला एक महत्वाकांक्षी प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तो त्याचा आगामी प्रोजेक्ट होता. मात्र आता तो यापुढे होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे असे की, आमीर हा महाभारतावर एक वेबसीरिज तयार करणार होता. नेहमीप्रमाणे ती मालिका ओटीटीच्या काही जाचक अटींमध्ये अडकली आणि त्यामुळे त्यावर काम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आमीर महाभारतावर जी मालिका तयार करणार होता ती आता बंद करणार असल्याची चर्चा वा-यासारखी सगळीकडे पसरली आहे. असे म्हटले जाते की, तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर याची तांडव ही मालिका भलत्या वादात सापडली होती. त्यावरुन मोठे राजकारण झाले होते. अखेर त्या मालिकेच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच न्यायालयानंही त्यांना फटकारले होते. तांडवला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणा-या एका सीनिअर अधिका-याला होणा-या नेहमीच्या डोकेदुखीमुळे ओटीटी आणि आमीर खाननं हा निर्णय घेतला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)

अमर उजालानं मागील वर्षी यासंबंधीचे एक वृत्त प्रकाशित केले होते. त्यात असे म्हटले होते की, आमीर खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या वतीनं महाभारत मालिकेला वेबसीरीजच्या माध्यमातून साकारण्यासाठीच्या परवानगीला लाल झेंडा दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे ही मालिका बनविण्यासाठी नेटफ्लिक्ससारख्या कंपनीनंही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र आमीरच्या चित्रपटांतून भारतीय इतिहासाची तोडमोड होत असल्याचा आरोप काहींनी केला होता. त्यामुळे त्याच्या नव्या मालिकेवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचा परिणाम संबंधित एका ओटीटी कंपनीवर होत आहे.

प्रसिध्द संगीतकार, बासरीवादक प्रभात शर्मा यांचे निधन

धमाकाचा टीझर आऊट; कार्तिकनं केला धूर,अवघ्या दहा दिवसांत झाले शुटिंग

काही दिवसांपूर्वी आमीर आणि अनुष्का शर्मा यांनी मा आनंद शीला यांच्यावर आधारित एक मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आमीर काही करणार तेवढ्यात अभिनेत्री प्रियंका चोप्रानं त्यावर मालिका तयार करण्याचे अधिकार विकत घेतले. आमीर खानला महाभारत या विषयावर अनेक वर्षांपासून नवा प्रोजेक्ट तयार कराय़चा होता. तो त्यात कर्णाची भूमिका करणार असल्याचीही चर्चा होती. आता महाभारतावर निर्माता वासु भगनानी चित्रपट तयार करणार आहेत. असेही सांगण्यात आले आहे. 
 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor aamir khan dropped his ambitious project Mahabharat is because of tandav controversy