अजय देवगणचा भाऊ अनिल देवगण यांचे निधन

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 6 October 2020

गेल्या वर्षी 27 मे 2019 बॉलीवूडमधील प्रसिध्द स्टंट डायरेक्टर व अभिनेता अजय देवगण याचे वडिल वीरु देवगण यांचे निधन झाले होते. वडिल गेल्यानंतरही अजयने एक भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यातून त्याने वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. 

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अजय देवगण याचा भाऊ अनिल देवगण यांचे निधन झाले. अशी माहिती अजयने त्याच्या ट्विटवरुन दिली आहे. काल रात्रीच आपण आपल्या भावाला अखेरचा निरोप दिल्याचे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली असून आता आमचे कुटूंब पोरके झाले आहे.

अनिलची मला कायमच आठवण येत राहील. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता सध्या नातेनाईक, मित्र परिवार यांना भेटीसाठी मनाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे कोणत्याही प्रकारचा श्रध्दांजलीपर कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे अजयने म्हटले आहे.  यावर अजयच्या असंख्य चाहत्यांनी त्याच्या भावाला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे. गेल्या वर्षी 27 मे 2019 बॉलीवूडमधील प्रसिध्द स्टंट डायरेक्टर व अभिनेता अजय देवगण याचे वडिल वीरु देवगण यांचे निधन झाले होते. वडिल गेल्यानंतरही अजयने एक भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यातून त्याने वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Ajay Devgan brother Anil Devgan passed away