अजयला बनवायचाय 'फूल और कांटे'चा रीमेक,कारण..

अजयला फूल आणि काटेचा रीमेक बनवायचा आहे असे त्याने प्रमोशनच्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.
Bollywood Actor wants to make remake on Phool Aur Kate remake
Bollywood Actor wants to make remake on Phool Aur Kate remakeesakal

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याचा 'रनवे ३४' येत्या शुक्रवारपासून सिनेमाघरांमधे येतोय.त्याच्या या चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.चित्रपटाची तारीख जशी जशी जवळ येतेय तसतसे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे.या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अजयने एक मोठा खुलासा केलाय.अजयला 'फूल आणि काटेचा' रीमेक बनवायचा आहे असे त्याने प्रमोशनच्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.नेमके काय कारण आहे त्यामागचे जाणून घेऊया.

अजय देवगणचा पहिला डेब्युट चित्रपट हा फूल और कांटे होता.त्याने या चित्रपटातून बॉलीवूडमधे पदार्पण केले होते.त्यानंतर आतापर्यंत त्याने जरी अनेक चित्रपट केले असतील तरी तो अजयचा पहिला आणि खास चित्रपट होता.त्याच्या या चित्रपटाला नोव्हेंबर महिण्यात ३१ वर्षे पूर्ण होणार आहेत.या चित्रपटात त्याने अमरीश पुरीच्या मुलाची भूमिका साकारली होती.या चित्रपटासाठी त्याला बेस्ट डेब्यू अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.

Bollywood Actor wants to make remake on Phool Aur Kate remake
Happy Birthday Ajay Devgan : 'सिंघम' पोहोचला पन्नाशीत!

फूल और कांटे बद्दल बोलताना अजय म्हणतो,मला फूल और काटे चा रीमेक बनवायचा आहे पण त्यासाठी मला नवीन कलाकारांसोबत काम करायला आवडेल.या जुन्या सिनेमाला एक नवीन रूप द्यायला आवडेल.अजयचा नवीन चित्रपट हा दोहा ते कोच्ची जाणाऱ्या विमानात घडलेल्या घटनेवर आधारित आहे.चित्रपटात अजय देवगण आणि रकुल प्रित मुख्य भूमिकेत आहेत.तसेच अमिताभ बच्चन, बोमन ईरानी, कैरी मिनाती हे सुद्धा चित्रपटात दिसून येते.अंगिरा धर या चित्रपटात प्रेक्षकांना एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे.आकांक्षा सिंग चित्रपटात अजयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.रनवे ३४ हा चित्रपट २९ एप्रिलला ईदच्या दिवशी चित्रपटगृहांत दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com