आता तरी देवा मला पावशील का? केदारनाथनंतर अक्षय कुमार बद्रीनाथ मंदिरात! व्हिडिओ व्हायरल...Akshay Kumar In Badrinath Dham | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar In Badrinath Dham

Akshay Kumar: आता तरी देवा मला पावशील का? केदारनाथनंतर अक्षय कुमार बद्रीनाथ मंदिरात! व्हिडिओ व्हायरल...

Akshay Kumar In Badrinath Dham: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या फ्लॉप सिनेमांमुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा नुकताच रिलीज झालेला सेल्फी हा नवीन सिनेमा सुद्धा फ्लॉप झालाय. अक्षय कुमार सध्या देवाच्या भक्तीचा तल्लीन झाला आहे.

चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये पोहोचलेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार भक्तीभावात तल्लीन झालेला दिसत आहे. शेवटच्या दिवशी तो केदारनाथ धाममध्ये पोहोचला होता आणि आज रविवारी त्यांने आधी जागेश्वर धाम आणि नंतर बद्रीनाथ धाम गाठलं आणि पुजा अर्चना केली.

काही दिवसांपूर्वी अक्षय केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. येथून त्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते. त्याच्या बद्रीनाथ मंदिराच्या दर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

यावेळी अक्षयच्या सुरक्षाव्यवस्था दिसली. यावेळी अक्षय कुमार ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. त्याने काळा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. यासोबतच त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळही दिसते.

कपाळावर चंदन लावून अक्षय कुमारने कडेकोट बंदोबस्तात मंदिरात प्रवेश केला आणि दर्शन घेतले. अक्षयने कपाळावर चंदनाचा टिळक लावला आहे. अक्षय मंदिराबाहेर त्याच्या चाहत्यांना भेटला. होते.

आता अक्षयच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी त्याच्या या फोटोंना प्रतिक्रियाही देत आहे. तर काहींनी तो 'ओह माय गॉड' च्या प्रमोशनसाठी हे सगळं करत असल्याचही म्हटलं आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो ओह माय गॉड 2 आणि Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये दिसेल त्याचबरोबर टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही आहे.

एका वर्षात सर्वाधिक चित्रपट देणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षयच्या नावाचा समावेश आहे. अक्षय त्याच्या जुन्या स्टारकास्ट सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबत 'हेरा फेरी 3' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

त्याचबरोबर 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातून तो मराठी चित्रपटातही एन्ट्री करत आहे.

टॅग्स :viralakshay kumar