
Akshay Kumar Visits Kedarnath: 'एक तरी सिनेमा हिट होऊ दे रे बाबा'! अक्षय केदारनाथ बाबाच्या चरणी
Akshay Kumar Visits Kedarnath: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अॅक्शन आणि कॉमेडीचा किंग आहे. अक्षय कुमार हा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.
गेले काही दिवस अक्षयसाठी काही खास राहिलेलं नाही. त्याचे बच्चन पांडे असो किंवा रक्षाबंधन नाहितर आत्ताच रिलिज झालेला सेल्फी. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले.
मात्र आता अक्षय वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अक्षय मंगळवारी केदारनाथ मंदिराला भेट दिली. अक्षयचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या व्हिडिओत तो मंदिरात फिरत आहे आणि मंदिराबाहेर हात जोडून फिरतांना दिसत आहे.
एएनआयने अक्षय कुमारचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारने कपाळावर टिका लावला आहे.
यात अक्षय कुमार काळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट पँट मध्ये देवाचं दर्शन घेतल्यानंतर अक्षय कुमार मंदिरातून बाहेर येतो आणि दोन्ही हात जोडून चाहत्यांचे आभार मानले आहे.
त्याचे चाहते त्याच्याभोवती जमले असताना त्याने उर्वरित अनुयायांसह 'हर हर महादेव' चा जयघोष केला आहे.
त्यासोबतच केदारनाथ धामचे फोटो अक्षयनेही सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "जय बाबा भोलेनाथ". व्हिडिओमध्ये, अभिनेता केदारनाथ धामच्या वादकांचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला पोहोचला होता आणि मंगळवारी हेलिपॅडवरून केदारनाथला पोहोचला. त्याने येथे बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्याला रुरकीमध्ये शूटिंग करायचे आहे.
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो OMG 2 आणि Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.
त्याच्याकडे टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही आहे जो 2024 मध्ये रिलीज होणार आहे. त्याचबरोबर तो 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागातही दिसणार आहे.