अमिताभने मारली सॉलीड किक..टायगर श्रॉफची किकही पडेल फिकी !

सकाळी सकाळी उठता बरोबर टायगर श्रॉफलाही आश्चर्य व्हावे अशी कीक अमिताभने मारलेली दिसते.
Amitabh Bachchan tried to do kick like Tiger Shroff shared photo on instagram
Amitabh Bachchan tried to do kick like Tiger Shroff shared photo on instagramesakal

अभिनेता अमिताभ बच्चनने चाहत्यांची सकाळ एनर्जेटिक केलेली दिसते.अमिताभने त्यांच्या इंन्साग्राम अकाऊंटला एक फोटो शेअर केलाय ज्यामधे या कलाकाराने टायगरच्या हिरोपंती २ च्या स्टाईलमधे किक मारतानाचा फोटो शेअर केलाय.सकाळी सकाळी उठता बरोबर टायगर श्रॉफलाही आश्चर्य व्हावे अशी कीक अमिताभने मारलेली दिसते.

अमिताभ बच्चनला 'बीग बी असंही संबोधले जाते.या वयातही त्यांच्या स्ट्राँगनेसला दाद द्यावी असं काम त्यांनी बॉलीवूड क्षेत्राला दिलं आहे.टायगरला त्याच्या किक स्टाईलसाठी प्रेक्षकांकडून फार प्रसिद्धी मिळाली आहे.त्याच्या सारखी किक आपल्यालाही मारता येईल या विचाराने अमिताभ बच्चन यांनी किक मारत काही फोटोज त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.तसेच त्यांनी या पोस्टला कॅप्शन दिले आहे की,टायगरच्या किकला प्रेक्षकांनी फार पसंती दर्शवली आहे.त्याला त्याच्या हिरोपंती २ साठी प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळाले आहेत.आज मीही त्याच्या सारखी किक मारण्याचा प्रयत्न करतोय.त्यांच्या या पोस्टसाठी त्यांना त्यांची नात नव्या नंदाने देखिल इंन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे.हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा 'अँग्री यंग मॅन' म्हणून संबोधले जाते.भारत सरकारने त्यांना कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल १९८४ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान,"नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com