अरबाज खान अडकला सट्टेबाजीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

अरबाज खानला सट्ट् लावण्याचा नाद आहे. तो सट्टेबाजीत कधीच जिंकला नाही. अरबाज हरलेले पैसे देत नसल्यामुळे बुकी सोनू मलाड त्याला धमकी देत होता.

अभिनेता आणि निर्माता अरबाज खान हा सध्या आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अडकला आहे. त्याने सामन्यादरम्यान सट्टेबाजी केल्याचेही पोलिसांसमोर कबूल केले आहे. ठाणे खंडणी गुन्हे पथकाच्या कार्यालयात काल (ता. 2) तो हजर झाला. त्याची कसून चौकशी करण्यात आली. 

अरबाज खानला सट्ट् लावण्याचा नाद आहे. तो सट्टेबाजीत कधीच जिंकला नाही. अरबाज हरलेले पैसे देत नसल्यामुळे बुकी सोनू मलाड त्याला धमकी देत होता. या दोघांतील संभाषणाची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागली आहे. 

अरबाजने तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये सट्ट्यात हरले आहेत. ही रक्कम तो सोनूला देण्यास टाळाटाळ करत होता. अरबाजचा भाऊ सलमान खानने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण अरबाजची ही सवय काही गेली नाही. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात काही आणखी बडी नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.    
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL