अभिनेता अर्शद वारसीचे ट्विटर अकाऊंट हॅक!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज आहे', अशी माहिती त्याने स्वतः त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन मंगळवारी दिली.

मुंबई : अभिनेता अर्शद वारसी याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. 'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज आहे', अशी माहिती त्याने स्वतः त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन मंगळवारी दिली.
 

'मी अकाऊंटचा पासवर्डसुद्धा बदलला आहे. मला आशा आहे की लवकरच माझं ट्विटर अकाऊंट पूर्ववत होईल,' असेही त्याने पुढे ट्विटर करत सांगितले आहे.
 

याआधीही अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. अर्शदचं अकाऊंट कोणी हॅक केलं याची अद्याप माहिती समोर आली नाही. अर्शद सध्या इंद्र कुमार दिग्दर्शित 'टोटल धमाल' या सिनेमात काम करत आहे. 'धमाल' या सिनेमाच्या सिरीजमधील हा तिसरा सिनेमा असेल. सिनेमात रितेश देशमुख, जावेद जाफरी, अजय देवगन, ईशा गुप्ता यांच्यासोबतच अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितही प्रमुख भुमिकेत असतील.  

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Arshad Warsis Twitter Account Hacked