खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन अशोक मामा घ्यायचे सुट्ट्या.. धमाल किस्सा !

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आले होते, त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला.
actor ashok saraf participate in kon honar crorepati show on sony marathi
actor ashok saraf participate in kon honar crorepati show on sony marathisakal

Ashok saraf : मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. 'कोण होणार करोडपती'च्या (kon honar crorepati)आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. अशोक मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत. (actor ashok saraf participate in kon honar crorepati show on sony marathi)

actor ashok saraf participate in kon honar crorepati show on sony marathi
सिद्धार्थ जाधवचा घटस्फोट? पत्नीनं सोशल मीडियावरुन 'जाधव' आडनाव हटवलं..

यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकासुद्धा चोख बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अभिनयातल्या अशा तळपणाऱ्या सूर्याच्या येण्यानी 'कोण होणार करोडपती'चा मंच उजळून निघणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.

अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका', 'नवरा माझा नवसाचा' असे अनेक हीट चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यांचा 'ययाती'पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या 'व्हॅक्युम क्लिनर'पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. अशोक मामांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सिनेनाट्यसृष्टीतल्याअनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. मामा म्हणाले, 'मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी मी बँकेत नोकरी करायचो आणि एकीकडे नाटकाचे दौरे सुरू असायचे. त्यावेळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन मी बँकेत सुट्टी घ्यायचो.' यासोबतच लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही मामांनी सांगितल्या. 'ययाती आणि देवयानी' ह्या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं, 'प्रेमा तुझा रंग कसा' या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्सा, 'भस्म' चित्रपटातल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग अधिकच रंगतदार होणार आहे. येत्या 25 जून, शनिवारी रात्री 9 वा. हा भाग प्रदर्शित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com