
आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर आसिफ यांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण काही पुढे आलेले नाही यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई - बॉलीवूड अभिनेता यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे घरात आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर आसिफ यांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण काही पुढे आलेले नाही यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. प्रचंड संघर्ष करणा-या या अभिनेत्याने हा प्रवास अमरावतीपासून सुरु झाला होता. हे फार कमी जणांना माहिती असेल.
हिंदी चित्रपटांबरोबरच आसिफ यांचा वेबसीरिजमध्ये फॅन फॉलोअर्स मोठा होता. 1989 मध्ये कामाच्या शोधात आलेल्या आसिफ यांचा प्रवास महाराष्ट्रातील अमरावतीपासून सुरु झाला होता.
आसिफ यांची सुरुवात थिएटरमध्ये काम करण्यापासून झाली. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या राँग साईड राजू या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.
आसिफ गेल्या काही वर्षांपासून हिमाचल प्रदेशातील धर्मशाला याठिकाणी राहत होते. पाच वर्षांपासून त्यांनी तिथे मित्रपरिवार जमवला होता. एवढेच नव्हे तर तेथील लोकांच्या घरगुती समारंभातही ते उत्साहाने सहभाहगी होत असे. त्यांना निमंत्रण मिळाले की ते त्या कार्यक्रमांना आवर्जुन जात असे.
आपण कुणी मोठा कलाकार आहोत असे वागणे त्यांच्या स्वभावात बसणारे नव्हते. ते सर्वांसोबत जमिनीवर बसुन जेवण घेत. विशेष म्हणजे त्यांना पहाडी संस्कृती, तेथील रितीरिवाज यांच्याविषयी प्रेम व आपुलकी होती.
आसिफ यांनी सांझ नावाच्या एका हिमाचली चित्रपटात अभिनय केला होता. त्यातील त्यांचा अभिनय स्थानिक प्रेक्षकांना कमालीचा भावला. ते आसिफ यांच्या प्रेमातच पडले. 14 एप्रिल 2017 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हिमालयीन संस्कृतीवर आधारित हा चित्रपट दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
हिमाचल प्रदेशांतील खेड्यांमध्ये आसिफ यांना विशेष रुची होती. शहारातील गोंगाटापेक्षा पहाडी भागातील शांतता त्यांना अधिक भावली. जेव्हा त्या भागात त्यांच्या एखाद्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असायचे अशा प्रसंगी त्यांनी मैक्लोडगंज येथे दोन घरे भाडयाने घेतली होती.