आयुष्मान खुराना बनला यूनिसेफ सेलिब्रिटी ऍडवोकेट, या पदावर असणा-या व्यक्तीला कोणत्या जबाबदा-या पार पाडाव्या लागतात? वाचा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 12 September 2020

या पदावर असलेल्या व्यक्तीकडे एक महत्वाची जबाबदारी असते. आणि आता ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आयुष्मान काय काय करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई- बॉलीवूडचा तरुण अभिनेता आयुष्मान खुरानाला देशात यूनिसेफचा सेलिब्रिटी ऍडवोकेट म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीकडे एक महत्वाची जबाबदारी असते आणि आता ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आयुष्मान काय काय करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आयुष्यामानला मिळालेल्या या पदासाठी त्याचे चाहते देखील खूप आनंदी आहेत.

हे ही वाचा: ड्रग्स कनेक्शनमध्ये रिया चक्रवतीने २५ नावांचा केला खुलासा, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह सोबत या सेलिब्रिटींचा समावेश? 

गायक- अभिनेता आयुष्मान खुराना देशातील यूनिसेफचा सेलिब्रिटी ऍडवोकेट बनला आहे. या पदावर असणा-या व्यक्तीला देशातील लहान मुलांविरोधात होणा-या हिंसेवर लोकांना जागरुक करण्याची आणि हि हिंसा कमी करण्याची जबाबदारी असते. हे काम देशातील प्रत्येक मुलासाठी समान असणार आहे. या अभियानासाठी जोडलं जाण्याचा एकंच उद्देश आहे तो म्हणजे देशातील प्रत्येक लहान मुलाला त्याचं बालपण व्यवस्थित अनुभवायाला मिळावं. 

या पदावर नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने आयुष्मानने आनंद व्यक्त केला आहे. त्याने म्हटलंय, 'मी खूप खूश आहे की यूनिसेफने मला या पदासाठी योग्य समजलं आणि या कामासाठी जोडण्याची संधी दिली. मला असं वाटतं की प्रत्येकाला आपलं आयुष्याची चांगल्या पद्धतीने सुरुवात करण्याचा हक्क आहे. जसं मी माझ्या मुलांना आनंद आणि सुरक्षेसोबत माझ्या घरात खेळताना पाहतो तेव्हा विचार करतो की प्रत्येक मुलाला त्याचं आयुष्य मोकळेपणाने जगण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. काही मुलांना पाहून खूप दुःख होतं की त्यांना लहानपणापासूनंच घरात किंवा बाहेर हिंसेला बळी पडावं लागतं.'

आयुष्मानला मिळालेलं हे एक असं पद आहे जे लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या किंवा सिनेमाशी संबंधित, खेळाशी संबंधित कोणा व्यक्तीला दिलं जातं. आपल्या पदाचा वापर करुन तो देशातील अडचणी दाखवून त्याविरुद्ध आवाज उठवू शकतो. ही व्यक्ती लोकांमध्ये त्या आजाराविषयी देखील जागरुकता निर्माण करु शकते ज्याची लोकांना माहिती नसेल. याव्यतिरिक्त आपत्ती दरम्यान फंड देखील गोळा करु शकते.   

Ayushmann Khurrana joins hands with UNICEF India to advocate for child  rights | Business Insider India

ayushmann khurrana appointed as unicef india celebrity advocate  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor ayushmann khurrana appointed as unicef india celebrity advocate