
एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या आश्रम ३ या वेब सीरिजवर आजतोवर अनेक टिकाटिपण्या करण्यात आल्या.बॉबी देओल(Bobby deol),ईशा गुप्ता,अनुप्रिया गोयंका,त्रिधा चौधरी,तुशार पांडे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका या वेब सीरिजमधे आहेत.पहिल्या सिजनपासूनच या सीरिजला अनेक लोकांचा विरोध होत आलेला आहे.याही सिजनमधे हिंदूत्वाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय.(Aashram 3)दिग्दर्शक प्रकाश झा याआधी अनेकदा या आरोपांवर व्यक्त झाले आहेत.यावेळी बॉबी देओल देखील मीडियापुढे व्यक्त झालाय.
'आश्रम ३' च्या सीरिजमधे बॉबी ढोंगी बाबा निरालाची भूमिका साकारत आहे.एका मुलाखतीत बॉबी म्हणाला,"हा शो इतका चाललाय म्हणजे नक्कीच प्रेक्षक या शो ला बघत आहेत.काही टक्केच लोकांना ही सीरिज आवडली नसेल.(OTT Platform)प्रत्येकाला स्वत:ची वेगळी मतं असू शकतात.त्यामुळे एखाद्याला व्यक्त होण्यापासून आपण रोखू शकत नाही.तुम्ही या सीरिजचं यश बघितलंत तर तुमच्या लक्षात येईल की यी सीरिजमधे काहीचं चूकीचं दाखवलेलं नाही."
याआधीही एका मुलाखतीत प्रकाश झा म्हणाले होते की,"भारतात धर्माविषयी एक उत्तम ओळ म्हटली जाते.माणूस धर्माला नाही वाचवू शकत तर धर्म माणसाला वाचवतो.त्यामुळे ज्यांनाही असं वाटतं की आपण धर्माला वाचवतोय तो त्यांचा केवळ गैरसमज आहे."'आश्रम ३' च्या तीन यशस्वी सिजननंतर आता चौथा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्याचा टीझर देखील प्रदर्शित झालाय.