बॉलिवूडचा 'हा' अभिनेता ठरला आशियातला सर्वात सेक्सी पुरुष !

This actor from Bollywood is the sexiest man of Asia
This actor from Bollywood is the sexiest man of Asia

मुंबई : बॉलिवूडमध्ये हॅंडसम अभिनेत्यांची कमी नाही ! या अभिनेत्यांची पसंती ही तितचीच आहे, मुली त्यांच्या मागे वेड्या आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांची पसंती जगभरातूनही आहेच. त्यामुळे हे कलाकार लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. पण आशियातला सर्वात सेक्सी पुरुष कोण? हे तुम्हाला माहित आहे का? याचा मान बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानेच पटकावला आहे. डान्स मास्टर हृतिक रोशनच्या नावाचा आशियातल्या सर्वात सेक्सी पुरुष 2019 च्या यादीत समावेश झाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Contemplating my next move to win the #War! 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

हृतिक फक्त 2019 मधलाच नाही तर या दशकातील आशियामधील सर्वाधीक सेक्सी पुरुष म्हणून निवडला गेला आहे. ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी एक पोल घेतला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When in doubt, always go with black. PC: @colstonjulian #tophatsarentonlyformagicians #stylingcheatcode

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

जगभरातून चाहत्यांनी यामध्ये मतदान केलं होतं आणि त्यातूनच टॉप 50 पुरुषांची य़ादी तयार करण्यात आली होती. यामध्ये बॉलिवूडचा अभिनेता आणि डान्स मास्टर हृतिकला सर्वाधिक मते मिळाली. 
याच यादीमध्ये इतर बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या नावाचा देखील समावेश आहे. शाहीद कपूर दुसऱ्या स्थानावर, टीव्ही अभिनेता विवियन डिसेना तिसऱ्या तर टायगर श्रॉफ चौथ्या स्थानावर आहे. 

हा मान पटकावल्यानंतर हृतिकने सोशल मीडियावरुन सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला,"मला मत दिल्याबद्दल मनासापासून आभार. पण, माझ्यासाठी व्यक्तीचे दिसणे महत्त्वाचे नाही. दिसण्यावरुन मी कोणाचेही परिक्षण करत नाही.त्याने आयुष्यात काय मिळवले आहे हे जास्त महत्त्वाचं वाटतं.'' नुकताच हृतिकचा 'वॉर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com