फराज खानच्या मदतीसाठी पूजा भट्टचा पुढाकार; वर्षभरापासून प्रकृती अस्थिर

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

फराजच्या उपचारासाठी 25 लाख रुपयांची गरज आहे. यासाठी त्याच्या नावाने फंड उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आतापर्यत फराजच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फंडामध्ये 1 लाख 8 हजार रुपये गोळा झाले आहेत. यासाठी अनेकांनी मदत करावे असे आवाहन पूजाने सोशल मीडियातून केले आहे.

मुंबई -आता कुणाला फराज खानचे नाव सांगितले तर ते कुणाला कळणार नाही. त्याचा फोटो पाहिल्यास त्यावरुनही त्याला कुणी ओळखणार नाही. तो इतका प्रसिध्द अभिनेताही नाही. राणी मुखर्जी आणि त्याचा एक चित्रपट ब-याच वर्षांपूर्वी आला होता. राणी मुखर्जीच्या चित्रपटाचा अभिनेता ही त्याची ओळख बनून गेली आहे. आता हा अभिनेता एका दुर्धर आजाराशी लढत असून त्याला उपचारासाठी पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. त्याला मदत करण्यासाठी अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक पूजा भट्ट हिने पुढाकार घेतला आहे. 

फराजच्या उपचारासाठी 25 लाख रुपयांची गरज आहे. यासाठी त्याच्या नावाने फंड उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आतापर्यत फराजच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फंडामध्ये 1 लाख 8 हजार रुपये गोळा झाले आहेत. यासाठी अनेकांनी मदत करावे असे आवाहन पूजाने सोशल मीडियातून केले आहे. मेहंदी, फरेब यासारख्या चित्रपटांमध्ये काम करणारा फराज आता बंगलोरमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंज घेत आहे. तो मेंदूच्या विकाराने त्रस्त आहे. 

 आपल्या आवाहनाला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी पूजाने टवि्ट केले आहे. त्यात ती म्हणते, आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणात आपण फराजला सहकार्य़ करावे. यासाठी जो फंड तयार करण्यात आला तो फराजच्या कुटूंबियांनी सुरु केला आहे. मागील वर्षापासून तो मेंदूच्या एका आजाराचा सामना करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
 
 
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Faraaz Khan battling for life in ICU after brain infection