आव्हानात्मक भूमिकेत यशाची गोडी

अनेक विविधांगी भूमिका साकारणारा गश्मीर आता 'विशु' या रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे.
Actor Gashmeer Mahajan
Actor Gashmeer Mahajanesakal
Summary

अनेक विविधांगी भूमिका साकारणारा गश्मीर आता 'विशु' या रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे.

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने (Gashmeer Mahajan) आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. अनेक विविधांगी भूमिका साकारणारा गश्मीर आता 'विशु' (Vishu) या रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे. मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित आणि बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटात गश्मीर महाजनी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली बातचीत.

Actor Gashmeer Mahajan
'नो रुल्स, नो कमिटमेंट'! गश्मीर महाजनी घेणार वेब सिरीजमध्ये धमाकेदार एन्ट्री

'विशु' या तुमच्या आगामी चित्रपटातील भूमिकेबद्दल काय सांगाल?

या चित्रपटात मी विश्वनाथ म्हणजेच विशुची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात एकंदरीत विशुच्या नजरेतून कॉर्पोरेट विश्वातलं जग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन, माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अनेक जण आठ तासांसाठी बांधील झाले आहेत. जर आपल्या बॉसने दिलेलं टार्गेट पूर्ण करता आले नाही तर आपल्याला ते एका दुधात पडलेल्या माशीप्रमाणे बाहेर फेकून देतात. दरम्यान, तो व्यक्ती तुम्हाला आउटपुट का देऊ शकला नाही किंवा त्यामागचं कारण काय? या सगळ्या गोष्टी कोणी पाहत नाही. त्या व्यक्तीची बाजू कोणी ऐकून घेत नाही. आज कॉर्पोरेट जगात माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे, असं मला वाटत आहे.

या चित्रपटातील भूमिकेसाठी काय विशेष तयारी केली?

ऐतिहासिक किंवा बायोपिक चित्रपटातील भूमिका साकारत असताना तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल अभ्यास करावा लागतो; परंतु अस्तित्वात नसलेले पात्र साकारताना तुम्ही आपल्या शैलीने ते साकारू शकता. माझ्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट येते, तेव्हा ती मी अनेकदा वाचायचो. जेणेकरून त्या पात्रात मला काय बदल घडवायचे आहे किंवा ते पात्र अजून कशाप्रकारे मला फुलवता येईल, हे मी पाहत असतो. विशु या चित्रपटातसुद्धा त्याचे दोन पैलू तुम्हाला पाहायला मिळतील.

Actor Gashmeer Mahajan
'ई सकाळ'च्या 'एफबी लाईव्ह'मध्ये आज स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी

विशुची भूमिका साकारताना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागले?

विशु हा साधा सरळ मुलगा असून तो आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून जगत असतो. यात त्याच्या दोन बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तो हा कॉर्पोरेट विश्वाला कशाप्रकारे हाताळतो, हे इंटरवलच्या आधीचा भागात आणि इंटरवलनंतरचा विशु हा त्याच्या गावातील असतो. खरंतर, यात कोकणातील विशु मी साकारण्याचा प्रयत्न केला. तिकडचं वातावरण, राहणीमान, तुमच्या देहबोलीमध्ये बदल घडवावा लागतो. या छोट्या-छोट्या गोष्टी माझ्या पात्रांमध्ये घडवून आणताना माझ्यासाठी आव्हानात्मक ठरलं.

तुम्ही आतापर्यंत रोमँटिक, ऐतिहासिक अशा विविधांगी भूमिका साकारली आहे. तुम्हाला कोणता जॉनर सर्वात जवळचा वाटतो?

मला नवनवीन पात्र साकारण्यास खूप आवडतं. कारण की त्यात अनेक गोष्टी शिकायला मिळतात, प्रेक्षकांनाही विविध भूमिका पाहायला मिळतात. एकाच जॉनरच्या भूमिका मिळाल्या तर ते साकारताना मलाही कंटाळवाणे वाटू शकते. आणि कदाचित प्रेक्षकांनाही पाहायला कंटाळा येऊ शकतो. प्रेक्षकांनाही नवीन काहीतरी पाहायला मिळत असल्याने मला नेहमी विविध प्रकारची पात्र साकारायला आवडतं.

तुम्ही पहिल्यांदाच मृण्मयी गोडबोलेसोबत स्क्रीन शेअर केली. एकंदरीत तुमचा अनुभव काय होता ?

मृण्मयीने अत्यंत कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे. ती अभिनय करण्याचा आव आणत नाही. ती सहज-सोप्या पद्धतीने नैसर्गिकरित्या अभिनय करते आणि ती गोष्ट मला खूप आवडली. मला असं वाटतं तिला अजून विविध प्रकारचे पात्र साकारण्यास मिळावे. तिच्या अभिनयाची दखल या इन्डस्ट्रीमध्ये घेतली पाहिजे. तिच्यासोबत काम करत असताना शूट चालू आहे किंवा अभिनय चालू आहे, असं कधीही वाटलं नाही. खऱ्या आयुष्यात तिच्यासोबत मी संभाषण करत आहे, असं वाटायचं.

आगामी प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगाल?

ऐतिहासिक सरसेनापती हंबीरराव चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि एका हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगसाठी दिल्लीला जाणार आहे. त्याचं ओटीटीवर लॉन्चिंग होणार आहे. हे दोन मोठे प्रोजेक्ट प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहेत.

- भाग्यश्री कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com