Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेनं घेतला ब्रेक; कारण आलं समोर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor gaurav more take break from maharashtrachi hasyajatra and fly to london

Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेनं घेतला ब्रेक; कारण आलं समोर..

Actor Gaurav More : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले.

या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'गौरव मोरे'. स्किट दरम्यान गौरव मोरेचा अपमान झाला नाही असा आजतागायत एकही भाग झालेला नाही. स्वतःवर विनोद करत प्रेक्षकांना हसवण्याचे बहुमोलाचे काम तो करत आहे.

त्याचे गाजलेले स्किट आजही समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. पण पुढचे काही दिवस गौरव आपल्याला हास्य जत्रेत दिसणार नाहीय. गौरवने हास्य जत्रेतून ब्रेक घेतला आहे. नुकतीच याबाबत अपडेट समोर आली आहे.

(actor gaurav more take break from maharashtrachi hasyajatra and fly to london)

गौरव सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असतो. त्याच्या कामासंदर्भातील अपडेट तो सोशल मीडियावर वेळोवेळो देत असतो. नुकताच गौरव ने एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे. ज्यामध्ये गौरव मुंबई विमानतळावर दिसत आहे. सोबत तो लंडनला जात असल्याचे म्हंटले आहे. त्याच्या या दौऱ्याची आता बरीच चर्चा आहे.

गौरवची ही दुसरी लंडनवारी आहे. या आधीही तो एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भरत जाधव यांच्यासोबत लंडन मध्ये गेला होता. तो त्याचा पहिला लंडन दौरा होता. त्यावेळी त्या प्रवासाची धाकधूक, चाळीतील जीवनाची पार्श्वभूमी यावर तो बराच व्यक्त झाला होता.

पण आता गौरव नक्की लंडनला कशासाठी गेला हे मात्र त्यानं गुलदस्त्यात ठेवलं आहे. किंवा याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पण तो पुन्हा एकदा चित्रीकरणासाठीच लंडनला गेला असल्याचे बोलले जात आहे. (maharashtrachi hasyajatra

गौरव पहिल्यांदा जेव्हा लंडनला गेला होता, ज्यावेळी त्याने तिथले बरेच फोटो शेयर केले होते. पण यामध्ये त्याने शेयर केलेले बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचे फोटो विशेष चर्चेत राहिले. गौरव याविषयी भरभरून व्यक्त झाला होता.