'गोविंदाने कधी केली कादर खान यांची चौकशी?'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि दिवंगत अभिनेते कादर खान या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गोविंदा कादर खान यांना वडिलांसमान मानायचा, असे खुद्द गोविंदानेच अनेकदा सांगितले आहे. परंतु, कादर खान यांची तब्येत बिघडल्यानंतर गोविंदाने कधीही त्यांना फोन केला नाही, असा आरोप कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने केला आहे.

एका वृत्त संस्थेशी बोलताना सरफराज खान म्हणाला, 'गोविंदा हा कादर खान यांना वडिलांसमान मानायचा. दोघांनी अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या असून, चित्रपटसृष्टीतील कामगिरीमध्ये कादर खान यांचे मोठे योगदान आहे. असे गोविंदा म्हणतो, परंतु, माझे वडील आजारी असताना गोविंदाने एकदाही त्यांना कधी फोन केला नाही. वडिलांच्या निधनानंतर सुद्धा गोविंदाने आम्हाला फोन केला नाही.'

कादर खान यांच्या निधनाची माहिती मिळताच गोविंदाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती. त्यामध्ये गोविंदाने म्हटले होते की, 'ते (कादर खान) माझे उस्तादच नव्हते तर माझ्यासाठी ते माझ्या वडिलांसमान होते. त्यांच्या परिसस्पर्शाने त्यांनी अनेक सामान्य कलाकारांना सुपरस्टार बनवले. त्यांच्या जाण्याने मी खूप काही गमावले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी इतकीच प्रार्थना मी करतो.’

परंतु, प्रत्यक्षात गोविंदाने कादर खान यांच्या तब्येतीची कधीही विचारपूस केली नव्हती, असा आरोप कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor govinda never calls to inquire dads health says kader khans son sarfaraz khan