अभिनेता हर्षवर्धन राणे कोरोना पॉझिटीव्ह, सोनू सूदने दिली अशी प्रतिक्रिया..

harshavardhan rane
harshavardhan rane

मुंबई- कोरोनाच्या विळख्यातून बॉलीवूडकरांची सूटका झालेली नाही. अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता हर्षवर्धन राणेलाही कोरोना झाल्याचं समोर येतंय. त्याने याबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ट्विटवर त्याने एक नोट शेअर करत सांगितलंय की त्याला ताप आणि पोटदुखी होती. या तक्रारीमुळे तो हॉस्पिटलमध्ये गेला असता तिथे कोरोना टेस्ट केल्यावर तो पॉझिटीव्ह आढळून आला. 

हर्षवर्धन राणेने नोट शेअर करत लिहिलं आहे की, नमस्कार प्रेमळ मित्रांनो, 'मला ताप आणि पोटदुखी होती त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी सांगितलं की ही व्हायरल तापाची लक्षणं आहेत कारण त्याची फुफ्फुस अगदी स्वस्थ आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीत. सामान्य कोविड टेस्टमुळे ही शंका दूर करायची होती. माझं आरोग्य सेतु ऍप सांगतंय की मी आता कोविड-१९ पॉझिटीव्ह आहे. ठिक आहे. मला १० दिवस आयसोलेशनमध्ये राहावं  लागेल. तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट होती मित्रांनो पण आता मला वाटतं की तुम्हाला आणखी १० दिवस त्यासाठी वाट पाहावी लागेल. चला तर चांगली बातमी आणि निरोगी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. तुम्ही माझी काळजी करु नका. माझ्यासाठी उपचारांची व्हॉट्सअप युनिवर्सिटी पाठवू नका.'

हर्षवर्धनच्या या नोटनंतर 'पल्टन' सिनेमात त्याचा को-स्टार असलेल्या सोनू सूदने मेसेज करत म्हटलं, 'भावा, कोरोनाची ऐशीची तैशी.' सोनू सूद सोबतंच हर्षवर्धनच्या यो पोस्टवर इंडस्ट्रीतून आणि चाहत्यांकडून त्याला लवकर ठिक होण्याचे मेसेज येत आहेत.   

actor harshvardhan rane tests positive for covid 19  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com